Best Diwali Gift: गिफ्ट देण्यासाठी बेस्ट कॉलिंग स्मार्टवॉच, किंमतही तीन हजाराहून कमी

Best Diwali Gift under 3000 rupees best calling smartwatch under 3000 in india
Best Diwali Gift under 3000 rupees best calling smartwatch under 3000 in india

Best Diwali Gift: भारतात दिवाळीची वाट जवळपास वर्षभर पाहिली जाते, भारतासोबतच जगभरातील भारतीय मिळून दिवाळी आनंदात साजरी करतात. यंदाची दिवाळी २४ ऑक्टोबरला साजरी होणार आहे. या सणानिमित्त मिठाईसह भेटवस्तूही दिल्या जातात. तुम्हीही तुमच्या जवळच्या आणि प्रिय व्यक्तींना उपयुक्त भेटवस्तू देण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. आज आपण सर्वोत्तम कॉलिंग स्मार्टवॉचबद्दल जाणून घेणार आहोत. चला जाणून घेऊया.

Crossbeats ignite Grit

ही 3 हजारांखालील गिफ्टसाठी सर्वोत्तम पर्याय आहे. हे घड्याळ 2,999 रुपयांना खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच रॉयल ब्लू, इंक ब्लू आणि रोझ पिंक कलर पर्यायांमध्ये उपलब्ध आहे. स्मार्टवॉच सोबत ब्लूटूथ कॉलिंग सुविधा उपलब्ध आहे. स्मार्टवॉचला एक मोठा 1.75-इंचाचा चौरस आकाराचा डायल मिळतो, जो सुपर व्हिव्हिड AMOLED डिस्प्लेसह येतो.

व्हॉईस असिस्टंट आणि ब्लूटूथ कॉलिंगसह हे स्मार्टवॉच 150 हून अधिक स्पोर्ट्स मोड आणि 200 हून अधिक वॉच फेसला सपोर्ट करते. ब्लड ऑक्सिजन ट्रॅकर, हार्ट रेट मेजरमेंट, स्टॉप वॉच, टाइमर, कॅमेरा कंट्रोल, म्युझिक प्लेबॅक, रिअल-टाइम वेदर, ट्रॅक युअर फओन, कॅल्क्युलेटर, महिला आरोग्य मॉनिटर आणि ड्रेनिंग वॉटर सपोर्टसह AI इनबिल्ड हेल्थ सेन्सर्स देखील यामध्ये देण्यात आले आहेत.

Fire-Boltt Phoenix

हे स्मार्टवॉच तुम्हाला 1,899 रुपयांना खरेदी करता येईल. हे स्मार्टवॉच गोल डिस्प्ले आणि क्लासिक डिझाइनसह तीन ब्लॅक, सिल्व्हर ग्रे आणि रोझ पिंक कलर पर्यायांसह येते. या स्मार्टवॉचमध्ये 1.3 इंच HD डिस्प्ले आणि 7 दिवसांच्या बॅटरी बॅकअपसह 100 हून अधिक स्पोर्ट्स मोड उपलब्ध आहेत. या स्मार्टवॉचमध्ये 100 पेक्षा जास्त क्लाउड-बेस्ड स्मार्टवॉच फेसेस आणि पाणी आणि धूळ प्रतिरोधक IP68 रेटिंगसह येते. फायर-बोल्ट फिनिक्स स्मार्टवॉचमध्ये हर्ट रेट मॉनिटरींग, स्पीड मॉनिटर, रक्त ऑक्सिजन ट्रॅकिंगसाठी SpO2, स्ट्रे, स्लीप मॉनिटर आणि वुमन सायकल (Cycle) ट्रॅकिंग यासारख्या हेल्थ ट्रॅकिंग फीचर्स देखील मिळतात.

Best Diwali Gift under 3000 rupees best calling smartwatch under 3000 in india
Maharashtra Police: अमित ठाकरेंचं पोलिसांसाठी फडणवीसांना भावनिक पत्र; म्हणाले, "चुकीचा..."

Realme Watch 3

रिअलमीचे हे स्मार्टवॉच 2,999 रुपयांना उपलब्ध आहे. दिवाळी गिफ्टसाठीही हा उत्तम पर्याय आहे. Realme Watch 3 सह, एक मोठा डिस्प्ले आणि 500 ​​nits ब्राइटनेस मिळत आहे. Realme Watch 3 चांगल्या डिझाईनसह येतो, यात 110 पेक्षा जास्त वॉच फेस आणि 110 फिटनेस मोड आहेत. 24-तास हार्ट रेट मॉनिटरिंग व्यतिरिक्त, या स्मार्टवॉचमध्ये स्टेप काउंटर, स्ट्रेस मॉनिटर आणि स्लीप ट्रॅकिंग सारखी फीचर्स आहेत. यात वॉटर रेझिस्टंटसाठी IP68 रेटिंग मिळते, वॉचमध्ये 7 दिवसांचा बॅटरी बॅकअपही देण्यात आला आहे.

Noise Colorfit Icon Buzz

नॉईज कलरफिट आयकॉन बझ हे 3 हजारांत मिळणारे बेस्ट स्मार्टवॉच आहे. हे स्मार्टवॉच 1,599 रुपयांना खरेदी करता येईल. स्मार्टवॉचसोबत 1.69-इंचाचा TFT LCD डिस्प्ले उपलब्ध आहे. ब्लड ऑक्सिजन मॉनिटरसाठी SpO2 सेन्सर, 24x7 हार्ट रेट आणि ब्लड प्रेशर मॉनिटरिंग यासारख्या वैशिष्ट्यांसह हे घड्याळ येते.

100 क्लाउड बेस्ड वॉच फेस आणि सायकलिंग, रनिंग सारखे 8 वर्कआऊट मोड घड्याळासोबत उपलब्ध आहेत. नॉइज कलरफिट आयकॉन बझमध्ये नॉइज हेल्थ सूट आणि कनेक्टिव्हिटीसाठी व्हॉइस असिस्टंटसाठी सपोर्ट आहे. याशिवाय Noise Colorfit Icon Buzz मध्ये 7 दिवसांचा बॅटरी बॅकअप उपलब्ध आहे.

Best Diwali Gift under 3000 rupees best calling smartwatch under 3000 in india
New App : मुलांची शाळा सुटताच पालकांना मिळणार अलर्ट; गुगलचं नवं अ‍ॅप

DIZO Watch R

DIZO चे हे वॉच आर देखील एक अप्रतिम स्मार्टवॉच आहे, ते AMOLED डिस्प्लेला सपोर्ट करते. स्मार्टवॉचची किंमत 3,399 रुपये आहे, परंतु ती बँक सवलतीसह 3 हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत खरेदी केली जाऊ शकते. DIZO Watch R मध्ये 1.3-इंचाचा अल्ट्रा-शार्प AMOLED डिस्प्ले आणि मेटल फ्रेम आहे. डिस्प्लेवर 2.5D कर्व्ह्ड ग्लास देखील आहे जो अँटी फिंगरप्रिंट कोटिंगसह येतो.

यासह 150+ कस्टमाइज कराता येणारे फेसेस उपलब्ध आहेत. अलवेज ऑन डिस्प्ले देखील स्मार्टवॉचमध्ये उपलब्ध आहे. Dizo Watch R हे कंपनीचे पहिले स्मार्टवॉच आहे जे गोल स्क्रीनसह आले आहे. घड्याळात हार्ट रेट मॉनिटर सेन्सरशिवाय ब्लड ऑक्सिजनसाठी SpO2 सेन्सरही देण्यात आला आहे. याला वॉटर रेझिस्टंटसाठी 5ATM ची रेटिंग मिळाली आहे. स्मार्टवॉचला 150 हून अधिक स्मार्टवॉच फेसेस मिळतात. DIZO Watch R ला 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com