Best Electric Car | सिंगल चार्जवर 'या' इलेक्ट्रिक कार धावतात 450 किमी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hyundai Kona

सिंगल चार्जवर 'या' इलेक्ट्रिक कार धावतात 450 किमी

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशावरचा ताण मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत महागडी कार वापरणे अनेक कारमालकांसाठी आणखी कठीण झाले आहे. दरम्यान, सध्या देशात इलेक्ट्रिक वाहनांचा ट्रेंड झपाट्याने वाढला आहे, सर्वच कंपन्या बाजारात लूक आणि दमदार रेंज असलेल्या कार लॉंच करत आहेत. आज आपण अशाच काही गाड्यांबद्दल जाणून घेणार आहोत ज्या एका चार्जवर शेकडो किलोमिटर्स आरामात चालतात.

इलेक्ट्रिक कारची सर्वोत्तम ड्रायव्हिंग रेंज म्हणजे ती पूर्ण चार्ज झाल्यानंतर किती किलोमीटरचा प्रवास करू शकते. कारने एक लिटर पेट्रोलमध्ये जितके अंतर कापले त्याला त्याचे मायलेज असे म्हणतात. चला तर मग त्या इलेक्ट्रिक कारबद्दल जांणून घेऊ ज्यांची रेंज 300 किमी पेक्षा जास्त आहे.

हेही वाचा: लॉंच झाली देशातील सर्वाधिक मायलेज देणारी कार, पाहा किंमत

ह्युंदाई कोना (Hyundai Kona)

या यादीत पहिले नाव Hyundai Kona चे आहे, जी भारतीय बाजारात दाखल होणारी पहिली इलेक्ट्रिक कार होती. कोना जुलै 2019 मध्ये लॉन्च करण्यात आली होती. कंपनीच्या मते, पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 450 किमी पर्यंत प्रवास करू शकते. इतकंच नाही तर खास गोष्ट म्हणजे ही कार चार्ज होण्यासाठी फक्त 30 मिनिटे लागतात. Hyundai Kona दोन इलेक्ट्रिक व्हेरियंटमध्ये येते.

टाटा नेक्सॉन

Tata Nexon EV देखील रेंजच्या बाबतीत कोणापेक्षा कमी नाही, पूर्ण चार्ज केल्यानंतर ही कार 300 किमी पर्यंत धावू शकते. कंपनीच्या म्हणण्यानुसार, ही कार चार्ज करण्यासाठी 15A सॉकेटचा वापर केला जातो आणि पूर्ण चार्ज होण्यासाठी 8 तास लागतात. मात्र, फास्ट चार्जरच्या मदतीने कार एक ते दीड तासात पूर्ण चार्ज होऊ शकते.

हेही वाचा: पुढच्या आठवड्यात येतेय Hyundai Creta; काय असतील नवीन फीचर्स?

एमजी झेडएस (MG ZS)

एमजी कंपनीने इलेक्ट्रिक कार्सच्या बाबतीतही आपला ठसा उमटवला आहे आणि तिची एमजी झेडएस ईव्ही कार देखील बेस्ट ऑप्शन आहे. ही कार लिक्विड कूल लिथियम ऑइल बॅटरी सपोर्ट दिला आहे जी पूर्ण चार्ज केल्यावर 340 किमी पर्यंत धावू शकते. याशिवाय, MG च्या डीलरशिपवर लावलेल्या फास्ट चार्जरच्या मदतीने कार 50 मिनिटांत 80 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते. सामान्य होम एसी चार्जरसह पूर्ण चार्जिंगसाठी 6 ते 8 तास लागतात.

loading image
go to top