Best Engine Oils
Best Engine Oilsesakal

Best Engine Oils : एवढ्या प्रकारचे आहेत Engine Oils, तुमच्या गाडीसाठी कोणतं आहे बेस्ट?

किती प्रकारचे इंजिन ऑईल आहेत आणि काय आहेत फायदे आणि तोटे

Best Engine Oils : आपलं आरोग्य सुस्थितीत ठेवायचं असेल आपल्याला वेळोवेळी हेल्थ चेकअप, रूटीन चेकअपची गरज असते. आपल्या शरीरातील धमन्यांमध्ये धावणारं रक्त शुद्ध असेल तरच आपण निरोगी असतो. तसंच, गाड्यांची योग्य काळजी घ्यावी लागते त्यासाठी त्यात वापरलं जाणारं पेट्रोल डिझेलही योग्य असावं लागतं.

कार आणि बाइकच्या हेल्थसाठी इंजिन ऑईल खूप महत्त्वाचं असतं. वाहनाचं इंजिन अनेक वर्ष टिकावं, ते स्मूदली परफॉर्म करत राहावं यासाठी वाहनात अधून-मधून इंजिन ऑईलचा वापर करा, इंजिन ऑईल वरचेवर बदला असं सांगितलं जातं. प्रामुख्याने वाहन सर्व्हिसिंग करून झाल्यावर त्यातलं इंजिन ऑईल बदलण्यास सांगितलं जातं. (Best Engine Oils : Engine Oil Grades explained What are types of engine oil for cars and bike?)

Best Engine Oils
Google Search Engine : गुगलला फटका; मायक्रोसॉफ्ट बिंगची मागणी वाढली

पेट्रोल-डिझेल आणि सीएनजी व्यतिरिक्त कार किंवा बाईकसाठी आणखी एक तेल लागतं, ज्याला इंजिन ऑईल म्हणतात. ही इंजिने अनेक प्रकारची असतात. आता जर तुम्हाला माहित असेल की तुमच्या वाहनासाठी कोणतं इंजिन ऑईल बेस्ट ठरेल तर तुमच्या गाडीचे इंजिन पार्ट्स तुम्हाला बराच काळ सपोर्ट करत राहतील.

कारसाठी इंजिन ऑईल खूप महत्वाचे आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमच्या गाडीसाठी कोणतं इंजिन ऑईल चांगलं ठरेल. किंबहुना एकच उत्पादन जेव्हा बाजारात अनेक गुणवत्तेत उपलब्ध होते, तेव्हा कोणता माल घेणे योग्य ठरेल, याबाबत लोक संभ्रमात पडतात.

महागड्या उत्पादनांबद्दल एक सामान्य धारणा आहे की ती चांगली असेल. तर अनेकदा तुम्हाला महागड्या वस्तूंची खरंच गरज नसते. असेच काहीसे इंजिन ऑईलच्या बाबतीत आहे. बाजारात इंजिन ऑईलचे अनेक प्रकार आहेत आणि कोणते इंजिन ऑईल त्यांच्यासाठी चांगले असेल हे लोकांना समजत नाही.

Best Engine Oils
Construction Engineers Transfer : बांधकाम अभियंत्यांच्या बदल्यातही मुख्यमंत्र्यांना शिफारशींसाठी साकडे

सर्वप्रथम इंजिन ऑईलबद्दल हे जाणून घेणं गरजेच आहे की, इंजिन ऑईल केवळ तुमच्या कार किंवा बाईकच्या इंजिनला वंगण देण्याचे काम करत नाहीत. तर इंजिनचे तापमानही नियंत्रित करतात जेणेकरून इंजिनमधील अति उष्णतेमुळे त्याचे भाग खराब होणार नाहीत.

तर जाणून घ्या किती प्रकारचे इंजिन ऑईल आहेत आणि काय आहेत फायदे आणि तोटे...

कन्वेंशनल इंजिन तेल

कन्वेंशनल इंजिन तेल किंवा खनिज तेलाला नैसर्गिक किंवा खनिज इंजिन तेल देखील म्हणतात, जे पूर्णपणे पेट्रोलियम उत्पादन आहे. हे इंजिन ऑईल क्रूड ऑईल सोबत येते. नंतर इंजिन ऑईल कच्च्या तेलापासून वेगळे केले जाते. या प्रक्रियेत अँटी-फोमिंग एजंट्स, झिंक, फॉस्फरस आणि सल्फर मॅलूकल अॅसिड सारखे पदार्थ त्यात मिसळले जातात. हे पदार्थ इंजिनभागांमधील घर्षण आणि ऑक्सिडेशनचा प्रभाव कमी करतात.

फायदे

कन्वेंशनल इंजिन तेल सर्वात स्वस्त आहे.

कन्वेंशनलइंजिन ऑईल देखील आपल्या वाहनाचे इंजिन पूर्णपणे सुरक्षित ठेवते.

हे इंजिन तेल जास्त काळ टिकत नाही. कारण त्यांचे वंगण लवकर संपते.

ते थोडे कमी परिष्कृत असतात, म्हणून जर आपण ते आपल्या वाहनाच्या इंजिनमध्ये वापरत असाल तर ते थोडे लवकर बदलत रहा.

Best Engine Oils
Auto : सर्वसामान्यांना महागाईचा फटका; आजपासून 'या' कंपन्यांची वाहनं महागली

सेमी-सिंथेटिक इंजन ऑईल

सेमी-सिंथेटिक तेलांबद्दल, असे म्हणता येईल की हे खनिज आणि सिंथेटिक इंजिन तेलदरम्यान आहेत. सेमी सिंथेटिक इंजिन ऑईल हे मुळात खनिज तेल असले तरी त्यात ३० टक्क्यांपर्यंत सिंथेटिक ऑईल घातले जाते. यासाठी फारसा खर्च येत नाही आणि सामान्य तेलापेक्षाही चांगले आहे.

फायदे

अर्ध-सिंथेटिक इंजीन तेलामध्ये थोड्या प्रमाणात मिनरल ऑईल असते.

हे सिंथेटिक तेलापेक्षा कमी चांगले मानले जाते.

यामुळे ते कृत्रिम तेलापेक्षा स्वस्त देखील आहे.

Best Engine Oils
Electric Auto Rickshaws : या आहेत भारतातील टॉपच्या Electric Auto; व्यवसायासाठी आहेत परफेक्ट!

फुल सिंथेटिक इंजिन ऑईल

पूर्ण सिंथेटिक इंजिन ऑईल खूप उपयुक्त आहे. पूर्ण सिंथेटिक तेल अधिक परिष्कृत असतात आणि म्हणूनच ते वाहनाच्या इंजिनसाठी सर्वोत्तम मानले जातात. मात्र, हे इंजिन तेल थोडे महाग आहे. सिंथेटिक इंजिन तेल इतरांपेक्षा जास्त काळ टिकते. यामुळे इंजिनच्या आतील भागांचे घर्षण कमी होते, ज्यामुळे इंजिन दीर्घकाळ चांगले राहते आणि देखभाल ीचा खर्च वाचतो.

फायदे

सिंथेटिक तेलाद्वारे उत्कृष्ट लुब्रिकेशन मिळते.

ज्या वाहनांमध्ये हे तेल टाकले जाते त्या वाहनाला उत्कृष्ट मायलेज प्राप्त होतो.

या तेलाने इंजिनमधील पिस्टनचे घर्षण कमी होते.

सिंथेटिक इंजीन तेल इतरांपेक्षा बरेच दिवस टिकते.

Best Engine Oils
Auto Expo : मनपसंत कार व बाइक निवडण्याची संधी; एकाच ठिकाणी असंख्य ब्रॅंड्स

हाय मायलेज ऑईल

हाय मायलेज इंजिन ऑईलमध्ये काही विशेष पदार्थ जोडले जातात, ज्यामुळे कारचे मायलेज वाढते. या प्रकारच्या इंजिन ऑईल चे बाष्पीभवन कमी होते आणि इंजिनची कार्यक्षमता देखील उत्कृष्ट असते.

हे इंजिन ऑईल लांबचा प्रवास करणाऱ्या वाहनांमध्ये वापरले जाते. जर तुम्ही तुमची कार किंवा बाईक जास्त वापरत असाल तर जास्त मायलेजसाठी हाय मायलेज देणारे इंजिन ऑईल हा उत्तम पर्याय असू शकतो.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com