Best Mileage Cars : बेस्ट Mileage देणाऱ्या देशातल्या टॉप कार्स कोणत्या? तूम्ही कोणती कार निवडाल!

Best Mileage Cars in India: सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या देशातल्या टॉप ५ कार
Best Mileage Cars
Best Mileage Cars esakal

Best Mileage Cars : पेट्रोल आणि डिझेलच्या सततच्या वाढत्या किंमतींचा परिणाम लोकांच्या दैनंदिन जीवनावर होत आहे. त्यामुळेच आता लोक जास्त मायलेज देणाऱ्या वाहनांना प्राधान्य देऊ लागले आहेत.

तुम्हीही सर्वात जास्त इंधन कार्यक्षम वाहनांच्या शोधात असाल, तर तुम्ही योग्य ठिकाणी आला आहात. आज आम्ही तुम्हाला सर्वात जास्त मायलेज देणाऱ्या वाहनांबद्दल सांगणार आहोत.

पेट्रोल डिझेलच्या आवाक्याबाहेर जाणाऱ्या किंमतींनी देशाचं राजकारण तापवायला सुरुवात केली आहे. ही परिस्थिती कधी सुधारेल हे काही सध्या सांगता येणार नाही.

मात्र या काळात तुम्हला कार खरेदी करताना पेट्रोलचं टेन्शन असेल तर त्यात आम्ही तुमची मदत करु शकतो कारण आज आम्ही तुमच्यासाठी अशा ५ कार्सची यादी घेऊन आलो आहोत, ज्या तुमचं पेट्रोलचं टेन्शन कमी करतील.

Maruti Suzuki Celerio

Maruti Suzuki ची खास गोष्ट म्हणजे ती भारतीय बाजारपेठेसाठीच
बनवली गेली आहे. कारण या गाडीचे मायलेज बेस्ट आहे. Maruti Suzuki सेलेरियोच्या सर्व ट्रिम्सपैकी मारुती सुझुकी सेलेरियो एएमटीचे सर्वाधिक मायलेज आहे. AMT ट्रिम्सचे मायलेज 26.68 kmpl आहे.

Maruti Suzuki Celerio
Maruti Suzuki Celerio esakal

Hyundai Grand i10 Nios

Hyundai Grand i10 Nios ही देशातील सर्वात जास्त इंधन कार्यक्षम कार आहे. Hyundai Grand i10 Nios मध्ये, तुम्हाला 26.2 किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळेल. आम्‍ही तुम्‍हाला सांगूया की ते परवडणार्‍या किमतीसह उत्तम लुकमध्ये येते. भारतात याला चांगली मागणी आहे.

Hyundai Grand i10 Nios
Hyundai Grand i10 Nios esakal

TATA Altroz ​​

Tata Altroz ​​मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रदेशानुसार अनेक मायलेज पाहायला मिळतात. हा कंपनीचा दावा आहे. यामध्ये तुम्हाला 26 किलोमीटर प्रति लीटर मायलेज मिळते. टाटा मोटर्स ही देशांतर्गत वाहन उत्पादक कंपनी आहे. जी किंमत आणि मायलेज असलेल्या कार बनवण्यासाठी ओळखली जाते. टाटा मोटर्सची टाटा अल्ट्रोज देखील सर्वाधिक मायलेज देणार्‍या कारच्या यादीत समाविष्ट आहे.

दरवर्षीच्या वार्षिक विक्री अहवालात टाटा मोटर्सच्या वाहनांना खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. त्याच वेळी, कंपनीच्या विक्रीत पूर्वीपेक्षा अधिक वाढ दिसून येत आहे.

TATA Altroz
TATA Altroz esakal

Honda City e:HEV

Honda City e:HEV ही कार तिच्या सेगमेंटमधील पहिली हायब्रिड इंजिन असलेली सेडान कार आहे. हायब्रीड पॉवरट्रेनमुळे, सिटी हायब्रिड 27किलोमीटर प्रति लीटर इतकं मायलेज देते. या कारमध्ये 40 लीटरचा फ्यूल टँक दिला आहे.

म्हणजेच एकदा टाकी फुल केली की ही कार तब्बल 1000 किमीपर्यंत धावू शकते. यात इंटर्नल कम्बशन इंजिन (आयसी) बसवलेल्या दोन इलेक्ट्रिक मोटर्स आहेत. हे इंजिन 1.5 लीटर अॅटकिन्सन हायब्रिड पेट्रोल इंजिन आहे जे 98 Bhp पॉवर आणि 127 Nm टॉर्क जनरेट करु शकतं.

Honda City e:HEV
Honda City e:HEVesakal

Hyundai i20

Hyundai i20 ही एक प्रीमियम हॅचबॅक कार आहे. यात लोकांना आकर्षित करतील असे अनेक फीचर्स दिले आहेत. मात्र ही कार तिच्या मायलेजसाठी ओळखली जाते. या कारमध्ये दिलेलं १.५-लीटर डिझेल इंजिन २५.२ किमी/लीटर इतकं मायलेज देण्यास सक्षम आहे.

हे इंजिन ९८.३ बीएचपी पॉवर आणि २४० न्यूटन मीटर टॉर्क जनरेट करतं. इतर ह्युंदाई कार प्रमाणे, ह्युंदाई आय २० ही कारदेखील उत्तमोत्तम फीचर्ससह येते.

Hyundai i20
Hyundai i20esakal

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com