
Best Sedan Cars: तुमच्या फॅमिलीसाठी परफेक्ट आहे 'या' टॉप-३ सेडान कार, किंमत बजेटमध्ये; पाहा डिटेल्स
Best Sedan Cars in India: हेचबॅक सेगमेंटनंतर कमी बजेटमध्ये येणाऱ्या सेडान सेगमेंटला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळतो. तुम्ही जर कमी किंमतीत येणारी सेडान कार खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात अनेक शानदार पर्याय उपलब्ध आहेत. अवघ्या ६ लाख रुपयांच्या बजेटमध्ये येणाऱ्या चांगला सेडान कार बाजारात उपलब्ध आहेत. कमी किंमत, पॉवरफुल इंजिन आणि शानदार इंटेरियरसह येणाऱ्या टॉप-३ सेडान कारविषयी सविस्तर जाणून घेऊया.
हेही वाचा: Smartphone Offer: बंपर डिस्काउंट! अर्ध्या किंमतीत मिळतोय Google चा लेटेस्ट स्मार्टफोन, फीचर्स खूपच जबरदस्त

Tata Tigor
टाटा टिगोर (Tata Tigor)
Tata Tigor सेडान सेगमेंटमधील सर्वात स्वस्त कार आहे. या कारची एक्स-शोरुम किंमत ६.०९ लाख ते ८.८४ लाख रुपयांपर्यंत आहे. कारमध्ये ११९९सीसीचे १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे ८६पीएस पॉवर आणि ११३एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल आणि ५ स्पीड एएमटी गियरबॉक्ससह येते. कंपनीचा दावा आहे कार २०.३km/l माइलेज देते.
Honda Amaze
Honda Amaze मध्ये १४९८सीसीचे इंजिन देण्यात आले आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेल दोन्ही पर्याय मिळतील. यात ७ इंच टचस्क्रीन इंफोटेनेमेंट सिस्टम, क्रूझ कंट्रोल, पॅडल शिफ्टर्स, फ्रंट सीट्ससाठी ड्यूल एअरबॅग्स, रियर पार्किंग सेंसर सारखे फीचर्स मिळतील. यामध्ये १.२ लीटर पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे ९०पीएस पॉवर आणि ११०एनएम पीक टॉर्क जनरेट करते. कारची किंमत ६.६३ लाख रुपयांपासून ते ११.५० लाख रुपयांपर्यंत आहे.
हेही वाचा: क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Maruti Suzuki Dzire
Maruti Suzuki Dzire
Maruti Suzuki Dzire मध्ये ११९७सीसीचे १.२ लीटर ड्यूल जेट पेट्रोल इंजिन देण्यात आले असून, हे इंजिन ९०पीएस पॉवर आणि ११३एनएम पीक टॉर्क जनरेट करते. हे इंजिन ५ स्पीड मॅन्यूअल आणि एएमटी गियरबॉक्ससह येते. फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये ७ इंच टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, पुश बटन स्टार्ट-स्टॉप, रियर पार्किंग सेंसर, ऑटो एसी, रियर एसी वेंट, क्लाउड बेस्ड सर्व्हिस, हिल होल्ड असिस्ट सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. कारची किंमत ६.२४ लाख रुपये ते ९.१८ लाख रुपयांपर्यंत आहे.