Best Smartphones: नवीन फोन खरेदी करायचाय? १२ हजारांच्या बजेटमधील 'हे' हँडसेट एकदा पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Best Smartphones

Best Smartphones: नवीन फोन खरेदी करायचाय? १२ हजारांच्या बजेटमधील 'हे' हँडसेट एकदा पाहाच

Best Smartphones Under 12000: तुम्ही जर कमी किंमतीत येणारा नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर बाजारात एकापेक्षा एक चांगले डिव्हाइस उपलब्ध आहेत. अवघ्या १२ हजार रुपयांच्या बजेटमध्ये तुम्ही शानदार फीचर्ससह येणाऱ्या फोन्सला खरेदी करू शकता. या बजेटमध्ये Redmi, Realme, Samsung, Poco आणि Lava सारख्या कंपन्यांच्या फोन्सला खरेदी करता येईल. या फोन्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Ptron Bassbuds Epic: एकापेक्षा एक शानदार फीचर्ससह नवीन इयरबड्स लाँच, किंमत फक्त...

Realme C35

Realme C35 स्मार्टफोनची सुरुवाती किंमत ११,९९९ रुपये आहे. या हँडसेटमध्ये यूनिसोक टी६१६ प्रोसेसर, ५० मेगापिक्सलचा ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी आणि फुल एचडी डिस्प्ले दिला आहे.

LAVA Blaze 5G

LAVA Blaze 5G ची सुरुवाती किंमत जवळपास ११ हजार रुपये आहे. फोनमध्ये ५जी सपोर्ट मिळतो. तसेच, मीडियाटेक डायमेंसिटी ७०० प्रोसेसर, १२ वायर्ड चार्जिंग सपोर्टसह ५००० एमएएचची दमदार बॅटरी मिळेल.

Redmi 10

Redmi 10 फोनच्या ४ जीबी रॅम+६४ जीबी स्टोरेजची किंमत ९,९९९ रुपये आणि ६ जीबी+१२८ जीबी स्टोरेजची किंमत ११,९९९ रुपये आहे. फोनमध्ये ६००० एमएएचची बॅटरी, स्नॅपड्रॅगन ६८० प्रोसेसर, ६.७१ इंच डिस्प्ले, १८ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि ८ जीबीपर्यंत व्हर्च्यूअल रॅम सपोर्ट दिला जातो.

हेही वाचा: Auto Expo 2023: जबरदस्त! MG ने सादर केली हाइड्रोजन फ्यूल-सेल MPV, फुल टँकमध्ये 600KM धावणार

POCO M5

POCO M5 ची सुरुवाती किंमत १२,४९९ रुपये आहे. ऑफरचा फायदा मिळाल्यास फोनला १२ हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. पोकोच्या या हँडसेटमध्ये ६.५८ इंच डिस्प्ले, ५००० एमएएच बॅटरी, ५० मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप, मीडियाटेक हीलियो जी९९ प्रोसेसर सारखे फीचर्स मिळतील.

Samsung Galaxy F13

Samsung Galaxy F13 मध्ये ६.६ इंच FHD+ डिस्प्ले, ४GB रॅम आणि १२८GB इंटरनल स्टोरेजसह Exynos ८५० प्रोसेसर, १५W फास्ट चार्जिंग सपोर्टसोबत ६०००mAh ची बॅटरी मिळेल. फोटोग्राफीसाठी रियरला ५० मेगापिक्सल + ५ मेगापिक्सल + २ मेगापिक्सल ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे. या फोनची सुरुवाती किंमत ११,९९९ रुपये आहे.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून