Ptron Bassbuds Epic: एकापेक्षा एक शानदार फीचर्ससह नवीन इयरबड्स लाँच, किंमत फक्त... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ptron Bassbuds Epic

Ptron Bassbuds Epic: एकापेक्षा एक शानदार फीचर्ससह नवीन इयरबड्स लाँच, किंमत फक्त...

Ptron Bassbuds Epic Launched: Ptron सातत्याने भारतीय बाजारात कमी किंमतीत येणाऱ्या ऑडिओ प्रोडक्ट्सला लाँच करत आहे. आता कंपनीने अवघ्या ८०० रुपयांच्या बजेटमध्ये Ptron Bassbuds Epic ला लाँच केले आहे. या बड्समध्ये दमदार बॅटरी लाइफ, TruTalk ENC फीचर मिळेल. Ptron Bassbuds Epic च्या किंमत आणि फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

Ptron Bassbuds Epic ची किंमत

Ptron Bassbuds Epic ची किंमत ८९९ रुपये आहे. परंतु, इंट्रोडक्टरी ऑफर अंतर्गत या बड्सला फक्त ७९९ रुपये किंमतीत खरेदी करता येईल. हे बड्स फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत.

हेही वाचा: Auto Expo 2023: जबरदस्त! MG ने सादर केली हाइड्रोजन फ्यूल-सेल MPV, फुल टँकमध्ये 600KM धावणार

Ptron Bassbuds Epic चे फीचर्स

Ptron Bassbuds Epic हे शानदार डिझाइनसह येतात. सोबत डिजिटल डिस्प्ले देखील मिळेल. या बड्समध्ये ८एमएम डायनॅमिक ड्राइव्हर्स देण्यात आले आहेत. तसेच, कनेक्टिव्हिटीसाठी ब्लूटूथ व्हर्जन ५.३ चा सपोर्ट मिळेल.

बड्समध्ये लो-लेटेंसी गेमिंग मोड देण्यात आला आहे. क्लिअर कॉल्ससाठी यात TruTalk ENC फीचरचा सपोर्ट मिळतो. स्टीरियो फोन कॉल्ससाठी यात ड्यूल एचडी माइक दिले आहेत. म्यूझिक आणि कॉल्स कंट्रोल्ससाठी यात टच सपोर्ट मिळतो.

हेही वाचा: Microsoft: ...अन्यथा तुमचा लॅपटॉप धूळखात पडलाच म्हणून समजा; वाचा काय आहे प्रकरण

यात पॅसिव्ह नॉइज कॅन्सिलेशनचा देखील सपोर्ट मिळतो. बड्सला वॉटर रेसिस्टेंटसाठी IPX4 रेटिंग मिळाले आहे. तसेच, फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३५ तासांची दमदार बॅटरी मिळेल. हे बड्स खास गेमिंगसाठी बनवण्यात आले आहेत. बड्सच्या खरेदीवर तुम्हाला १ वर्षाची वॉरंटी दिली जाते. वॉइस असिस्टेंट सपोर्टसह येणाऱ्या या बड्सला काळ्या रंगात खरेदी करता येईल.

हेही वाचा: गुंतवणूक करताना ‘हम होंगे कामयाब, पूरा है विश्वास!’...पण कसे? घ्या जाणून

टॅग्स :Technology