Smartphone Tips: तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? या टिप्स फॉलो केल्यास सहज दूर होईल समस्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Smartphone battery

Smartphone Tips: तुमच्या फोनची बॅटरी लवकर संपते? या टिप्स फॉलो केल्यास सहज दूर होईल समस्या

Android Phone's Battery Life: सध्याच्या काळात प्रत्येक कामासाठी स्मार्टफोन गरजेचा झाला आहे. मित्र-मैत्रिणींशी कनेक्ट राहायचे असो, अथवा ऑनलाइन पेमेंट करायचे असेल, स्मार्टफोन प्रत्येक ठिकाणी उपयोगी येतो. दिवसभर वापर होत असल्याने फोनची बॅटरी जास्त काळ टिकत नाही. अनेकदा, इंटरनेट आणि कॅमेऱ्याचा जास्त वापर केल्याने फोनच्या बॅटरी लाइफवर परिणाम होतो. सध्या बाजारात ५००० एमएएच, ६००० एमएएच बॅटरीसह येणारे फोन उपलब्ध आहेत. असे असतानाही फोनची बॅटरी लवकर संपते.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

तुमच्या फोनची बॅटरी देखील लवकर संपत असल्यास काळजी करण्याचे कारण नाही. आम्ही तुम्हाला अशाच काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुमच्या फोनची बॅटरी लाईफ वाढण्यास मदत होईल. या टिप्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

कमी करा रिफ्रेश रेट

सध्या बाजारात जास्त रिफ्रेश रेटचा डिस्प्ले असणारे फोन्स लाँच होत आहेत. डिस्प्लेचा रिफ्रेश रेट जेवढा जास्त असेल, तेवढ्या लवकर बॅटरी संपते. बॅटरी लवकर संपू नये यासाठी तुम्ही फोनच्या रिफ्रेश रेटला ऑटोवर सेट करू शकता. यामुळे फोनच्या गरजेनुसार रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आणि ९० हर्ट्जवर सेट होईल व फोनची बॅटरी लाईफ देखील वाढेल.

ब्राइटनेस ठेवा कमी

गरजेपेक्षा जास्त ब्राइटनेस ठेवल्यास बॅटरी लवकर संपते. तुम्ही रिफ्रेश रेटसोबतच ब्राइटनेस मोडला देखील ऑटोवर सेट करू शकता. ब्राइटनेस मोडला ऑटोवर सेट केल्यास बॅटरी लाइफ वाढण्यास नक्कीच मदत होईल.

हेही वाचा: Samsung Smart TV: अवघ्या २० हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही, ऑफर एकदा पाहाच

डेटा सेव्हिंग मोड करा सुरू

स्मार्टफोनमध्ये डेटा सेव्हिंग मोड सुरू ठेवल्यास बॅटरी लाईफ वाढवू शकता. यासाठी तुम्हाला सेटिंग्समध्ये जावे लागेल. त्यानंतर Dual Sims & mobile network वर टॅप करा. त्यानंतर Data traffic management मध्ये Data saving mode पर्याय दिसेल. हा मोड सुरू ठेवा. यामुळे बॅकग्राउंडमध्ये चालणारे अ‍ॅप्स डेटाचा वापर करणार नाही व बॅटरीची बचत होईल.

नॉटिफिकेशन ठेवा बंद

फोनची बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी अनावश्यक नॉटिफिकेशन बंद करणे हा चांगला पर्याय आहे. याशिवाय, गरज नसल्यास तुम्ही जीपीएस लोकेशन आणि ब्लूटूथला बंद करू शकता. फोन व अ‍ॅप्सला अप-टू-डेट ठेवल्यास बॅटरी लाईफ वाढण्यास मदत होईल.