Samsung Smart TV: अवघ्या २० हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही, ऑफर एकदा पाहाच | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Samsung Smart TV

Samsung Smart TV: अवघ्या २० हजारांच्या बजेटमध्ये मिळतोय मोठ्या स्क्रीनचा स्मार्ट टीव्ही, ऑफर एकदा पाहाच

Offer on SAMSUNG Smart TV: तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. Samsung च्या शानदार स्मार्ट टीव्हीवर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. तुम्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवरून SAMSUNG Crystal 4K 43 inch Ultra HD (4K) LED Smart TV ला बंपर डिस्काउंटसह खरेदी करू शकता.

हेही वाचा: Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

या टीव्हीची मूळ किंमत ५२,९०० रुपये आहे. परंतु, तुम्ही फ्लिपकार्टवरून फक्त २९,९०० रुपयात खरेदी करू शकता. याशिवाय, इतर ऑफरचा लाभ मिळाल्यास सॅमसंगचा ४३ इंच स्मार्ट टीव्ही फक्त १९,९०० रुपयात तुमचा होईल.

SAMSUNG Crystal 4K स्मार्ट टीव्हीवर मिळेल बंपर ऑफर

SAMSUNG Crystal 4K 43 inch Ultra HD (4K) LED Smart TV ला तुम्ही बँक ऑफरसह खूपच स्वस्तात खरेदी करू शकता. फेडरल बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर करून टीव्हीला खरेदी केल्यास १० टक्के डिस्काउंटचा फायदा मिळेल. सोबतच, ११ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा फायदा मिळेल.

सर्व ऑफर्सचा पूर्ण फायदा मिळाल्यास टीव्हीला फक्त १८,९९० रुपयात घरी घेऊन जाऊ शकता. याशिवाय, दरमहिना २,५०० रुपये देऊन देखील ईएमआयवर टीव्ही खरेदी करणे शक्य आहे. टीव्ही न आवडल्यास तुम्ही १० दिवसात बदलू देखील शकता. टीव्ही खरेदीवर १ वर्षाची वॉरंटी देखील मिळेल.

हेही वाचा: New Bajaj Pulsar : नव्या पल्सरची बाजारात एंट्री; आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स, किंमतही आवाक्यात

SAMSUNG Crystal 4K चे स्पेसिफिकेशन्स

SAMSUNG Crystal 4K हा ४३ इंच स्क्रीनसह येतो. याचे रिझॉल्यूशन ३८४०x२१६० पिक्सल आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. तर साउंड आउटपूट २० वॉट आहे. टीव्हीमध्ये Netflix, Youtube आणि Disney+Hotstar सारख्या अ‍ॅप्सचा देखील सपोर्ट मिळतो. टीव्ही Tizen ऑपरेटिंग सिस्टम सपोर्टसह येतो.

टॅग्स :Technologytvflipkart