SAKAL Exclusive : सावधान! 5G SIM Updateच्या नावाने बसतोय गंडा

5G SIM Upgrade Cyber Crime News
5G SIM Upgrade Cyber Crime Newsesakal

प्रसाद लवटे : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : देशात आता मोबाईल नेटवर्क क्षेत्रातील जलद मानल्या जाणाऱ्या ५जी सेवा (5G Service) कार्यान्वित होण्याचे वारे वाहू लागले आहे. अनेक दुरसंचार कंपन्यांनी यासंबंधी भाकित केले आहे. ही सेवा वापरण्यासाठी लागणारे ५जी तंत्रज्ञानाचे मोबाईल फोन बाजारात उपलब्ध झाले आहे. अद्याप मात्र ही सेवा सुरु झालेली नाही. तरी या भाकितांचा फायदा भामटे घेत आहेत. देशभरात सामान्यांना ५जी सुविधेचा लाभ घेण्यासाठी सिम अपग्रेडेशनच्या (SIM Upgradation) नावाखाली मोठे गंडे बसू लागले आहे.

देशात कार्यान्वित दुरसंचार कंपन्यांनी नेटवर्क क्षेत्रात अति जलद अशी ५ जी सेवा सुरु करण्याचे भाकित केले आहे. त्यानुसार देशात ५ जी सेवेचे जाळेही विणले जात आहे, मात्र प्रत्यक्षात ही सेवा सुरु झालेली नाही. मात्र समाजमाध्यमांवर (Social Media) ही सेवा कार्यान्वित झाल्याच्या अफवा येवू लागल्याने सामान्यांनाही ५जी सेवेचा लाभ घेण्याची ओढ लागली आहे. ग्राहकांमध्ये असलेली ही ओढ अन् उत्सुकता सायबर गुन्हेगारीला पोषक ठरत आहे. (Beware of 5G SIM Update Cyber Crime Fraud Nashik Latest Crime News)

5G SIM Upgrade Cyber Crime News
Cyber Crime : नाशिक पालिकेचा डेटा चोरण्याचा अमेरिकन हॅकरचा प्रयत्न

सध्या बहुतांश लोकांना ५जी सिम अपडेट करण्यासंदर्भात फोन येऊ लागले आहेत. यासह मेसेजेद्वारा लोकांना सर्रास लुटण्याचे प्रकार घडताना दिसत आहेत. कुणाच्याही मोबाईल क्रमांकावर ५जी अपडेशनची लिंक पाठवून त्यावर केवळ एका क्लिकवर बँक खात्याची संपूर्ण माहिती मिळवून गंडा घातल्याच्या घटना समोर येत आहेत असल्याची माहिती सायबर तज्ज्ञ अमर ठाकरे यांनी दिली.

सायबर तज्ज्ञ अमर ठाकरे सांगतात, महाराष्ट्र सायबर पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे सध्या मार्केटमध्ये सायबर गुन्हेगारांनी फसवणुकीची नवीन पद्धत अमलात आणल्याची दिसून येत आहे. यामध्ये ५जी सिम अपडेटच्या नावाखाली दोन वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना गंडा घातला जातोय.

पद्धत १ : मेसेज व्हर्जन फ्रॉड

यामध्ये ग्राहकांना स्पॅम मेसेज (Spam Message) करून लिंक पाठवली जाते. या लिंकमध्ये ५जी अपडेट करण्यासाठी क्लिक करण्यासाठी प्रवृत्त केले जाते. उत्सुकतेपोटी लोक त्यावर क्लिक करतात. त्यानंतर ग्राहकांना सिम कार्डच्या मागील १६ अंकी क्रमांक मागवण्यासाठी एक कोड दिला जातो. स्मार्टफोनवर तो कोड टाकल्यानंतर सिम कार्डच्या मागील बाजूस असलेला १६ अंकी क्रमांक मोबाईल स्क्रीनवर येतो. यानंतर या स्पॅमर्सला संबंधित क्रमांक बँक अकाउंटशी लिंक आहे की नाही ते कळते. यानंतर संबंधित ग्राहकाचे सिम कार्ड ब्लॉक करून स्वाईप केले जाते. यानंतर ग्राहकाचे त्याच्या स्वतःच्या सिमकार्डवर नियंत्रण राहत नाही आणि याद्वारे सिम कार्डवर ताबा मिळवून ग्राहकांना आर्थिक गंडा घातला जातो.

पद्धत २ : कॉल व्हर्जन फ्रॉड

यामध्ये ग्राहकांना समोरून टोल फ्री क्रमांक मेसेजद्वारे पाठवला जातो. त्या मेसेजमध्ये ५जी सिम अपग्रेड येथे करा असे दिले जाते. या टोल फ्री क्रमांकावर तुम्ही सिम अपग्रेडसाठी फोन केला तर अपग्रेडेशन प्रोसेसिंगच्या नावाखाली ग्राहकांना ओटीपी पाठविला जातो. मोबाईल क्रमांक क खात्याशी संलग्नित असल्यामुळे केवळ एका लहानशा ओटीपीच्या माध्यमातून मोठा गंडा घातला जातो.

5G SIM Upgrade Cyber Crime News
Cyber Crime : ठकबाजांनी महाराजांनाच लावला दिड लाखाचा चुना!

असा फोन किंवा मेसेज आल्यास काय करावे...?

यावर श्री. ठाकरे सांगतात, सध्या भारतात काही मोजक्याच अधिकृत कंपन्यांमार्फत ५जी संदर्भात अपडेट मिळू शकते. त्यामुळे वृत्तपत्र, प्रसार माध्यमांमध्ये अधिकृतरित्या कुठलीही माहिती उपलब्ध नाही. तरी अधिकृत माहिती आल्याशिवाय संबंधित कॉल किंवा मेसेज दुर्लक्षित करावे. हा सर्वाधिक सोपा उपाय आहे.

५ जी अपग्रेड अधिकृतरित्या करावयाचे असल्यास...

५ जी सिम अपग्रेड करायचे असल्यास आपल्या जवळच्या दुरसंचार कंपनीच्या अधिकृत सर्व्हीस सेंटरशी संपर्क साधावा. आपल्या अधिकृत सिम कंपनीच्या ऑफिसमध्येच जाऊन सिम अपग्रेडची माहिती मिळवावी व त्याप्रमाणे सिम अपग्रेड करावे.

"वर्षभरापुर्वी नाशिक शहरात ५ जी सिम अपडेटच्या नावाखाली एका वृद्धास सिम कार्ड बंद पडेल असा भिती दाखविणारा फोन आला. गोंधळेल्या वृद्धाने त्यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व प्रक्रिया पुर्ण करताच त्यांना तब्बल ३६ लाखाचा गंडा या सायबर भामट्यांनी घातला. त्यामुळे कोणीही अशा मेसेज किंवा कॉलला बळी पडू नये, असे झाल्यास त्वरित सायबर पोलिसांशी संपर्क साधावा." - अमर ठाकरे, सायबर तज्ज्ञ, नाशिक.

5G SIM Upgrade Cyber Crime News
Cyber Crime Alert : ऑनलाइन व्यवहार करताना सावधान!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com