Gmail Scam : एक ईमेल अन् मिनिटांत बँक अकाऊंट रिकामं! काय आहे हा Gmail फ्रॉड? आत्ताच जाणून घ्या नाहीतर होईल मोठे नुकसान

Gmail Phishing Scam : जीमेल वापरकर्त्यांना भुरळ घालणारी एक नवी फसवणूक समोर आली आहे. गुगलच्या नावाने आलेला ईमेल तुमचं बँक खातं हॅक करण्यास कारणीभूत ठरू शकतं.
Gmail Phishing Scam
Gmail Phishing Scamesakal
Updated on

Fake Gmail Scam : Gmail वापरकर्त्यांसाठी एक महत्त्वाची इशारा आहे. अलीकडेच एक ईमेल काही वापरकर्त्यांना पाठवला जातोय जो Google कडून आल्यासारखा दिसतो. पण प्रत्यक्षात तो एक फसवणुकीचा (phishing) प्रकार आहे, ज्यामध्ये तुमची वैयक्तिक माहिती चोरली जाऊ शकते.

या स्कॅममध्ये वापरले गेलेले ईमेल no-reply@google.com या अधिकृत पत्त्यासारखं दिसतं आणि "Verify your account activity" किंवा "तुमचं Gmail खाते बंद केलं जाईल" अशा प्रकारच्या मजकुराचा वापर केला जातो. यामध्ये "Review Activity" नावाचे बटन असते, ज्यावर क्लिक केल्यास बनावट वेबसाईटवर नेलं जातं आणि तिथे तुमचं लॉगिन, पासवर्ड, रिकव्हरी ईमेल आणि अगदी 2FA कोडही मागितले जातात.

या फसवणुकीचं विशेष लक्ष वेधून घेतलं ट्विटर/X वापरकर्ता निक जॉन्सन यांनी. त्यांनी आपल्या पोस्टमध्ये सांगितलं की, “ही ईमेल खरंच no-reply@google.com कडून आली आहे आणि Gmail देखील तिला खरी समजून कोणतीच क्रिया करत नाही.” यामध्ये Google चा अधिकृत लोगो, भाषा आणि ईमेल सिग्नेचर वापरलं जातं, ज्यामुळे ती पूर्णपणे खरी वाटते.

Gmail Phishing Scam
Oppo K13 : Oppoने लाँच केला सुपर मोबाईल! 7000mAh बॅटरीसह 80W फास्ट चार्जिंग; ब्रँड कॅमेरा अन् जबरदस्त फीचर्स, किंमत फक्त...
Gmail Scam
Fake Gmail Scamesakal

वापरकर्त्यांनी काय काळजी घ्यावी?

  1. कोणत्याही ईमेलमधील लिंकवर क्लिक करू नका. तुमचं खाते सुरक्षित आहे की नाही, हे तपासण्यासाठी नेहमी ब्राउझरमध्ये नवीन टॅब उघडून Gmail वर लॉगिन करा.

  2. ईमेल रिपोर्ट करा. Gmail मध्ये ईमेलच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदू क्लिक करून “Report phishing” पर्याय निवडा.

  3. Two-Factor Authentication (2FA) सुरू करा. हे अतिरिक्त सुरक्षा देते जेणेकरून फसवणूक करणाऱ्यांना जीमेलमध्ये सहज प्रवेश मिळणार नाही.

  4. ईमेलचा पत्ता बारकाईने पाहा. जरी नाव “Google” असलं तरी ईमेल अॅडरेस अनेकदा विचित्र आणि बनावट असतो. अशा गोष्टी अनेकदा बनावट ईमेलमध्ये आढळतात.

Gmail Phishing Scam
AC Safety Tips : उन्हाळ्यात दिवसरात्र AC सुरू ठेवताय? आरोग्यावर घातक परिणाम होण्याआधी 'या' 5 सवयी बदला अन् वीजही वाचवा

गेल्या काही वर्षांत सायबर फसवणुकीचं प्रमाण झपाट्याने वाढत चाललं आहे. म्हणून वापरकर्त्यांनी सावध राहणं अत्यंत आवश्यक आहे. जर अशा प्रकारची ईमेल आली, तर त्याकडे दुर्लक्ष करा आणि तात्काळ रिपोर्ट करा. आपल्या डिजिटल सुरक्षेसाठी थोडी जागरूकता फार मोठे काम करू शकते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com