Airtel आपली 5G सेवा कधी सुरू करेल? चेअरमन सुनील मित्तल म्हणाले... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bharti airtel chairman sunil mittal on airtel 5g services expects to launch in october 2022

Airtel आपली 5G सेवा कधी सुरू करेल? चेअरमन सुनील मित्तल म्हणाले...

Airtel 5G in India : आता लवकरच भारतात 5G नेटवर्क सुरू होणार आहे. देशभरात 5G सेवा सुरू होण्याची लोक वाट पाहत आहे. देशातील तीन मोठ्या टेलिकॉम कंपन्या 5G नेटवर्क सुरू करण्याच्या तयारीत आहेत. यासोबतच हे देखील पाहिलं जात आहे की जिओ किंवा एअरटेलमध्ये 5G नेटवर्क सुरु करणारे पहिले कोण असेल. पण आता भारती एअरटेलचे चेअरमन सुनील भारती मित्तल यांनी याबद्दल माहिती दिली आहे.

Airtel 5G कधी सुरू होईल

मीडिया रिपोर्ट्सनुसार, भारती एअरटेलचे चेअरमन सुनील मित्तल यांनी सांगितले की, एअरटेल गेल्या 24 महिन्यांपासून 5G नेटवर्क लॉन्च करण्याची तयारी करत आहे. 2022 च्या उत्तरार्धात 5G सेवा सुरू करण्यात येईल असा कंपनीचा अंदाज होता. मित्तल म्हणाले की, 5G लाँच ऑक्टोबरपासून सुरू होईल असे मंत्री म्हणाले होते, आम्हालाही अशीच अपेक्षा होती. ऑक्टोबरच्या सुरुवातीपासून देशात 5G नेटवर्कची सुरूवात होऊ शकते.

रिपोर्टनुसार, मित्तल यांनी सांगितले की, भारतातील काही लोकांना असे वाटते की 5G च्या बाबतीत भारत मागे राहिला आहे पण तसे नाही. भारतात 5G नेटवर्क सुरू होण्यास कोणताही उशीर झालेला नाही. उलट, आता भारतातील 5G ​​डिव्हायसेसच्या किंमतीही कमी होऊ लागल्या आहेत, ज्यामुळे देशासाठी ही योग्य वेळ आहे.

हेही वाचा: अध्यक्षपदाच्या निवडणुकीची तारीख ठरली; ‘या’ दिवशी मिळणार काँग्रेसला नवा अध्यक्ष

सुनील भारती मित्तल यांनी असेही सांगितले की, भारत सरकारने लिलावात भरपूर स्पेक्ट्रम ऑफर केले होते. 5G साठी देशात प्रचंड स्पेक्ट्रम आवश्यक आहे कारण त्याशिवाय 5G ची खरा आनंद मिळणार नाही. ते म्हणाले की भारत आता स्पेक्ट्रमच्या दृष्टीने आणि डिव्हायसेसच्या दृष्टिकोनातून 5G नेटवर्क सुरू करण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.

हेही वाचा: OnePlus चे अगदी स्वस्तातले इयरफोन्स लाँच; किंमत प्रत्येकाच्या बजेटमध्ये

रिलायन्स जिओ इन्फोकॉम लिमिटेडने 5G स्पेक्ट्रमसाठी सर्वाधिक 88,078 कोटी रुपयांची बोली लावली आहे. दुसरीकडे, भारती एअरटेल लिमिटेड दुसऱ्या क्रमांकावर आहे, ज्याने 43,084 कोटी रुपयांची बोली लावली आहे. तिसऱ्या क्रमांकावर वोडाफोन-आयडिया लिमिटेड आहे, ज्याने 18,799 कोटी रुपयांची बोली लावली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून 5G स्पेक्ट्रम लिलावाची प्रतीक्षा होती, जी आता यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे. या लिलावात एकूण 1,50,173 रुपयांची बोली लावण्यात आली आहे.

Web Title: Bharti Airtel Chairman Sunil Mittal On Airtel 5g Services Expects To Launch In October 2022

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Airtel5g network