Moon Express: चंद्राबाबत मोठी बातमी! नासाची मून एक्स्प्रेसची तयारी सुरू...

गेल्या काही वर्षांत चंद्रावर अशक्य असे प्रकल्प यशस्वी झाले आहेत. आता नासा चंद्रावर एक अशक्य मोहीम पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहे.
Moon Express
Moon Expressesakal
Updated on

Moon Express: इस्रोने चंद्रावर चांद्रायन ३ उतरवून जगात नाव कमावलं. जगातील अनेक देश चंद्रावर जाण्यासाठी योजना आखत आहेत. दरम्यान नासाकडून मोठी माहिती समोर आली आहे. अमेरिकन अंतराळ संस्था नासा मोठी मोहीमेची तयारी करत आहे. 

चंद्रावर पेलोड वाहतूक प्रदान करण्यासाठी रेल्वे प्रणालीसारखी 'विज्ञान कल्पित' संकल्पनांपैकी एक नासाच्या जेट प्रोपल्शन प्रयोगशाळेत विकसित केली जात आहे.

ही मोहीम यशस्वी झाली तर मानवाचा चंद्र प्रवास सोपा होणार आहे. हा काल्पनिक प्रकल्प आहे. एकूण सहा प्रकल्प आहेत आणि त्यापैकी प्रत्येकाने प्रारंभिक NIAC ( Innovative Advanced Concepts Program) टप्पा पूर्ण केला आहे.

मून एक्सप्रेस मिशनवर नासा काम करत आहे. जर हे शक्य झाले तर मानवजातीच्या इतिहासातील हे सर्वात मोठं यश असेल.

Moon Express
Gpay and Google Wallet : 'गुगल पे' अन् 'गुगल वॉलेट' एकसारखं नाही! दोन्हीमध्ये फरक काय अन् कुठे होतो वापर?

नासाचे वैज्ञानिक जॉन नेल्सन म्हणाले, हा प्रकल्प यशस्वी होईल याची शाश्वती नाही. मात्र भविष्यात मून एक्सप्रेस मिशन एरोस्पेस मिशनचा भाग बनू शकते. 

या प्रकल्पाबरोबर मंगळावर मानव आणि वस्तूंच्या हस्तांतरणासाठी अत्याधुनिक यंत्रणा विकसित करण्याचा देखील नासाचा प्रयत्न आहे. हे NASA प्रकल्प अभिनव प्रगत संकल्पना (NIAC) कार्यक्रमाचा भाग आहेत.

Moon Express
Gpay and Google Wallet : 'गुगल पे' अन् 'गुगल वॉलेट' एकसारखं नाही! दोन्हीमध्ये फरक काय अन् कुठे होतो वापर?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com