चुंबकाशिवाय चुंबकीय बल निर्माण करणाऱ्या अवलिया 'अ‍ॅम्पिअर'ची कहाणी

आज आपण विद्युत प्रवाहाचं एकक देणाऱ्या 'अ‍ॅम्पिअर'ची (Ampere) गोष्ट जाणून घेणार आहोत.
 Story of Andre Ampere
Story of Andre AmpereSakal
Summary

आज या नावाचा अर्थात ‘आन्द्रे अ‍ॅम्पिअर' यांचा जन्मदिन...विनम्र अभिवादन!

काल विद्युतशक्तीचं एकक देणाऱ्या ‘वॅट’ची गोष्ट सांगितली आज विद्युत प्रवाहाचं एकक देणाऱ्या ‘अ‍ॅम्पिअर’ची (Ampere) गोष्ट जाणून घेणार आहोत.(Story of Andre Ampere)

त्याचा जन्म फ्रान्समघील लायन इथं ‘जिन आणि जेनी’ या दाम्पत्याच्या पोटी एका सुखवस्तू व्यापारी कुटूंबात झाला. बाबा जिन यशस्वी उद्योजक असण्यासोबतच एक समाजाभिमुख व्यक्तित्व होतं तर आई जेनी थोडीशी देवभोळी अशी धार्मिक महिला होती. तो जन्मला तो काळच मुळात फ्रेंच राज्यक्रांतीचा (French Revolution) अत्यंत महत्वाचा आणि ऐतिहासिक कालावधी होता. रॉस्यू तत्वज्ञानाचा (Rosie's philosophy) पाईक असलेला त्याचा बाबा “विद्यार्थ्यानं चार भिंती आणि दोन पुस्तकात न अडकता थेट निसर्गाकडून शिकावं” या विचाराचा असल्यानं त्यानं आपल्या या मुलाला पारंपरिक शिक्षण न देता घरीच सगळा पुस्तकरुपी खजिना उपलब्ध करून दिला.

 Story of Andre Ampere
असंख्य स्त्रीया आणि बाळांचे प्राण वाचवणारे सिझेरियन तंत्रज्ञान

बाबाच्या या निर्णयामुळं झालं काय की ‘काही शालेय पुस्तकं आणि एखादा शिक्षक’ यापलीकडं मोठमोठाले ग्रंथराज आणि शास्त्रज्ञ-तत्वज्ञ (Science) त्याला घरबसल्या गुरू म्हणून लाभले. त्याला ‘हेच वाचल्यावरच प्रश्न विचारणार’ असली कुठलीच सक्ती नव्हती, त्याला हवं ते वाचायची मुभा होती, दोन चार प्रश्न विचारून कुणी त्याचं ज्ञान जोखेल याची भितीही नव्हती. त्यामुळं अनेकविध पुस्तकांची पानं त्याला आपसूकच तोंडपाठ झाली होती. असं हे अनौपचारिक तरी अगाध असं न संपणारं शिक्षण सुरू ठेवत तो एका टप्प्यावर लायन इथंच गणिताचा शिक्षक (Mathematics teacher) म्हणून रुजू झाला.

त्याच्या कुशल अध्यापनामुळं ‘ज्याला गणित आवडत नाही’ असा अगदी शेवटचा विद्यार्थीही वर्गात आवडीनं बसू लागला. त्याचा हातखंडा बघता त्याला लागलीच भौतिकशास्र (Physics) आणि रसायनशास्त्र (Chemistry) या विषयांचा प्राध्यापक म्हणून बढती मिळाली. अध्यापनासोबतच तो तत्वज्ञान आणि खगोलशास्त्र अभ्यासणं आणि बाजूला गणित-भौतिकशास्राचे प्रयोग करणं हा त्याचा रोजचा शिरस्ता बनला. अखंड वाचन चिंतन यातून त्यानं गणितावर सखोल लेखन आणि विद्युत गतीविज्ञानावर पायाभूत असं चिंतन केलं आणि यातूनच ‘विद्युतचुंबकत्वाचा सिद्धांत’ (Theory of Electromagnetism) जन्माला आला.

 Story of Andre Ampere
‘अन् आताही ती फिरतेय’ हे छोटंसं वाक्य क्रांतीचं प्रतिक होतं...

त्यानं विद्युत प्रवाह (Electric Current) आणि चुंबकत्व (Magnetism) या दोन्ही बाबींचा साकल्यानं अभ्यास केला. संख्य असंख्य प्रयोग केले आणि यातूनच तो “जेव्हा विद्युत प्रवाह दोन समांतर तारांमधून एकाच दिशेला जात असेल तर त्या तारा एकमेकांकडे खेचल्या जातील” या निष्कर्षाप्रत पोहोचला. हेच विरुद्ध घडलं तर? म्हणजे विद्युतप्रवाह दोन समांतर तारांतून विरुद्ध दिशेला जात असेल तर? तारा एकमेकांना दूर फेकतील असंही निरीक्षण आणि आकलन त्यानं मांडलं. ‘त्यात काय एवढं?’ असा प्रश्न आता पडू शकतो पण तेव्हा त्या काळात या पठ्ठ्यानं चुंबकाशिवाय चुंबकिय बल तयार करून दाखवलं होतं हे क्रांतीकारी पाऊल होतं.विद्युतप्रवाहांमुळं हे चुंबकिय बल (Magnetic Force) तयार झालं होतं त्यामुळं ‘विद्युत गतीविज्ञान’ (Electrodynamics) हा वेगळा अभ्यासाचा विषय झाला.

गणित आणि भौतिकशास्राव्यतिरिक्त हा बहाद्दर रसायनशास्त्रातही रमला त्याच्या आधी तज्ज्ञांनी चाळीस मुलतत्वे शोधून ठेवली होती यानं हायड्रोजन आणि फ्लुरॉईड यांना एकत्रित करून हायड्रोजन फ्लुरॉईड (Hydrogen fluoride) दिलं पक्ष अर्थात तांत्रिकदृष्ट्या त्याला तेव्हा हे शक्य झालं नाही, पण पुढं सत्तर वर्षांनी हे शक्य झालं. अनेक मानाच्या वैज्ञानिक संस्थेत त्याला मानद सदस्यत्व मिळालं, मानसन्मान मिळाले पण खाजगी आयुष्य मात्र फारसं आनंददायी गेलं नाही, वडलांच्या शेवटच्या दिवसात राजकिय अपयश, त्याचे दोन अपयशी लग्न या सगळ्या विवंचनेत आयुष्याचे उतारचढ सुरू राहिले पण ‘असतं हे असं असतं’ इतिहास तुमचं आकलन तुम्ही जगाला काय देऊन जाता यावर करत असतो.

वैयक्तिक खाचखळगे, सुखदुःख यांचं कुणाला फारसं देणंघेणं नसतं, लोकोत्तर माणसं यापलिकडं जाऊन आपलं योगदान देत असतात याची साक्ष आयफेल टॉवरवर त्याचं कोरलेलं नाव आजही देतं.

आज या नावाचा अर्थात ‘आन्द्रे अ‍ॅम्पियर’ यांचा जन्मदिन..

विनम्र अभिवादन !!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com