Black Friday Sale : 24 नोव्हेंबरला आहे 'ब्लॅक फ्रायडे'! कशी झाली याची सुरुवात? कंपन्या का देतात डिस्काउंट?

Black Friday Sale 2023 : यावर्षी 23 नोव्हेंबर, म्हणजेच आज थँक्सगिव्हिंग साजरा केला जात आहे.
Black Friday Sale
Black Friday SaleeSakal
Updated on

तुम्ही जर सातत्याने ऑनलाईन शॉपिंग करत असाल, तर गेल्या काही दिवसांपासून तुम्ही ब्लॅक फ्रायडे सेलबद्दल नक्कीच ऐकलं वा वाचलं असेल. जगभरातील कित्येक कंपन्या दरवर्षी ठराविक दिवशी ब्लॅक फ्रायडे सेलचं आयोजन करतात. यामध्ये कित्येक प्रॉडक्ट्सवर अविश्वसनीय असा डिस्काउंट दिला जातो.

काय आहे ब्लॅक फ्रायडे सेल?

अमेरिकेमध्ये या ब्लॅक फ्रायडे सेलची सुरुवात करण्यात आली होती. मात्र, गेल्या काही वर्षांपासून इतर देशांमध्येही हा साजरा केला जातो. याचा संबंध थेट नाताळशी आहे. ख्रिसमसच्या एक महिना आधीपासून लोक साधारणपणे खरेदीला सुरुवात करतात, यासाठी हा सेल आयोजित केला जातो.

या शब्दाचा उगम साधारणपणे सत्तरच्या दशकात झाला असल्याचं म्हटलं जातं. थँक्सगिव्हिंग उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी फिलाडेल्फिया शहरात ख्रिसमसच्या खरेदीसाठी रस्त्यांवर गर्दी होत होती. यावेळी गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांना अधिक काम करावं लागायचं. हे शक्यतो वीकेंडच्या सुरुवातीला, म्हणजेच शुक्रवारी होत असल्यामुळे तेव्हा पोलिसांनी या दिवसाला 'ब्लॅक फ्रायडे' असं म्हणण्यास सुरुवात केली.

Black Friday Sale
Heater for Home : यंदाच्या हिवाळ्यात घराला ठेवा गरम; स्वस्तात मिळतायत मस्त हीटर! पाहा बेस्ट ऑप्शन

मिशिगन विद्यापीठातील रॉस स्कूल ऑफ बिझनेसमध्ये मार्केटिंगचे प्राध्यापक असणाऱ्या मार्कस कॉलिन्स यांनी याबाबत अधिक माहिती दिली आहे. ख्रिसमसची शॉपिंग सुरू झाल्यामुळे ब्लॅक फ्रायडेच्या दिवशी दुकानांना मोठ्या प्रमाणात नफा होतो. त्यामुळेच, काही कंपन्यांनी याला 'बिग फ्रायडे' असं म्हणण्यास सुरुवात केली होती. मात्र हे नाव प्रचलित झालं नाही. या दिवसाला 'ब्लॅक फ्रायडे' हेच नाव चिकटून राहिलं.

कित्येक कारखान्यांमध्ये ब्लॅक फ्रायडे हा शब्द वेगळ्या अर्थाने देखील वापरला जात होता. कित्येक कर्मचारी थँक्सगिव्हिंगच्या डिनरनंतर दुसऱ्या दिवशी कामावर जाण्यास टाळाटाळ करत. यासाठी ते आजारी असल्याचं देखील सांगत. यामुळे कारखान्यांच्या मस्टरमध्ये या दिवसाचा उल्लेख ब्लॅक फ्रायडे असा होऊ लागला.

यानंतर काळाच्या ओघात, या दिवशी लोक अधिक खरेदी करत असल्यामुळे विविध दुकानदारांनी खास डिस्काउंट देण्यास सुरुवात केली. अशाच प्रकारे ब्लॅक फ्रायडे सेलची सुरुवात झाली.

यावर्षी कधी आहे ब्लॅक फ्रायडे सेल?

यावर्षी 23 नोव्हेंबर, म्हणजेच आज थँक्सगिव्हिंग साजरा केला जात आहे. तर उद्या (24 नोव्हेंबर) ब्लॅक फ्रायडे साजरा करण्यात येईल. यावेळी कित्येक मल्टिनॅशनल आणि भारतीय कंपन्या देखील सेलचे आयोजन करणार आहेत. अमेझॉन, ईबे अशा ई-कॉमर्स साईट्वर मोठे डिस्काउंट उपलब्ध असतील. सर्वात जास्त सूट ही मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, कम्प्युटर अ‍ॅक्सेसरीज आणि गेमिंग डिव्हाईसेसवर मिळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com