
Online Vegetables : भाजीपाला ऑर्डर करताना वेगळी कोथिंबीर विकत घ्यावी लागली म्हणून 'ब्लिंकइट' वापरणाऱ्या एका यूजरच्या आईला धक्काच बसला! वाचून थोडा आश्चर्य वाटेल; पण ही वस्तुस्थिती आहे. या घटनेनंतर ब्लिंकइट आता सब्जी ऑर्डर सोबत मोफत धनिया देत आहे. (How Blinkit plans to solve Indian moms' ‘Dhaniya problem’ with online delivery of vegetables)
अंकित सावंत यांनी ट्विटरवर (X) ही बाब लोकांशी शेयर केली. पारंपरिक बाजारपेठेत भाज्या घेताना मोफत कोथिंबीर घेण्याची जुनी पंढहात आहे, पण ऑनलाईन खरेदीत तर वेगळंच! त्यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "ब्लिंकइटवर कोथिंबीरसाठी वेगळे पैसे द्यावे लागल्यामुळे आईला थोडासा धक्का बसला. @albinder तुम्ही थोडी भाजी घेतल्यावर मोफत कोथिंबीर देऊ शकत नाही का?"
या टॅगवर ब्लिंकइटचे (Blinkit) सीईओ अल्बिंदर ढिंडसा यांनी त्वरित उत्तर दिले, "नक्की करू!" आणि काही दिवसातच त्यांनी मोफत कोथिंबीर (Free Coriander) देण्याची सुविधा सुरू केली. या संपूर्ण घटनेमुळे ६ लाख ५० हजारांहून अधिक लोकांनी ही पोस्ट पाहिली आणि ९ हजारांहून अधिक लोकांनी लाईक केलं.
मोफत कोथिंबीर मिळाल्यानंतर आता युजर्स मोफत हिरवी मिरचीचीही (हरी मिर्च) मागणी करत आहेत. "कोथिंबीरसोबत मिरचीही द्या ना," असा सूर काही युजर्सनी काढला आहे. तर "Hey! धनिया + हिरवी मिरची. (Free Chilli) फक्त धनिया चालणार नाही (फक्त धनिया चालणार नाही)," असे मजेदार कमेंट्सही पाहायला मिळत आहेत. (Blinkit News)
मोफत कोथिंबीर मिळवण्यासाठी वापरकर्त्यांना एका वेळी किमान 500 रुपयांची भाजी खरेदी करावी लागेल.
बघा, कधी कधी सोशल मीडियाची एक पोस्ट कित्येक लोकांसाठी फायद्याची ठरू शकते. आता मोफत कोथिंबीरसोबत हिरवी मिरची पण मोफत मिळेल का ते पाहणं उत्सुकतेच आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.