BMW ने लाँच केली 220i ब्लॅक शॅडो कार, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

220i Black Shadow
BMW ने लाँच केली 220i ब्लॅक शॅडो कार, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

BMW ने लाँच केली 220i ब्लॅक शॅडो कार, जाणून घ्या किंमत अन् फिचर्स

नवी दिल्ली : जर्मन लक्झरी कार उत्पादक कंपनी बीएमडब्ल्यूने भारतात BMW2 सीरिज ग्रॅन कूपे लिमिटेड एडिशनचे एक विशेष व्हेरिएंट 220i Black Shadow ला लाँच केले आहे. कंपनीने ही माहिती मंगळवारी दिली आहे. ब्लॅक शॅडोचे उत्पादन चेन्नईतील कारखान्यात होणार आहे. कंपनी म्हणते, की हे माॅडल २ लीटर चार सिलिंडर पेट्रोल इंजिनसह येते. या सेगमेंटमध्ये आपली चांगली कामगिरी दाखवण्यास तयार आहे. बीएमडब्ल्यू समुहाचे भारतातील अध्यक्ष विक्रम पवाह म्हणाले, बीएमडब्ल्यू २ सीरिज ग्रॅन कूपे लिमिटेड एडिशन या सणोत्सवाची भेट आहे. ब्लॅक शॅडो एडिशन आता नवीन पेट्रोल अवतारात तयार केली आहे. या द्वारे आमच्या ग्राहकांजवळ संधी आहे, की ते स्टाईल व परफाॅर्मन्ससह नवीन अनुभव घ्यायचा.

हेही वाचा: Boom Motors ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फिचर्स

फिचर्स आणि किंमत

बीएमडब्ल्यू 220i ब्लॅक शॅडोच्या कॅबिनमध्ये driver-focused हायक्लास इन्स्ट्रमेंट लावण्यात आले आहे. फ्रंटमध्ये मोठे पॅनोरमा ग्लास सनरुफ देण्यात आले आहे. यात ३ डी नेव्हिगेशनसह बीएमडब्ल्यू लाईव्ह काॅकपिट प्रोफेशनल, १०.२५ इंचाचे डिजिटल इन्स्ट्रुमेंट डिस्प्ले आणि १०.२५ इंचाचे कंट्रोल डिस्प्ले देण्यात आला आहे. २.० लीटरचे चार-सिलिंडर, टर्बो- पेट्रोल इंजिनने सज्ज ब्लॅक शॅडो १९० एचबीचे पाॅवर जेनरेट करते. त्यात कार केवळ ७.१ सेकंदात ०-१०० किमी प्रतितास वेग पकडते. येथे जे १९० बीएचपीचे पाॅवर आणि २८० एनएमचे पीक टाॅर्क जेनरेट करण्यात सक्षम आहे. याबरोबरच यात ७ स्पीड ऑटोमॅटिक गिअरबाॅक्स जोडले गेले आहे. किंमतीविषयी बोलाल तर शॅडोची एक्स शोरुममधील किंमत ४३.५० लाख रुपये आहे.

loading image
go to top