Boom Motors ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फिचर्स | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Boom Corbett
Boom Motors ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फिचर्स

Boom Motors ची पहिली इलेक्ट्रिक बाईक लाँच, जाणून घ्या फिचर्स

तामिळनाडूतील Boom Motors ने आपली पहिली इलेक्ट्रिक बाईक Boom Corbett लाँच केली आहे. दिसायला ती खूपच स्टायलिश आहे. याबरोबरच ती जड वस्तूही वाहून नेऊ शकते. बूम काॅर्बेट विशेषतः म्हणजे ही इलेक्ट्रिक बाईक २०० किलोग्रॅमपर्यंत वजन वाहून नेऊ शकते. यात २ बॅटरी ऑप्शन आहेत आणि ती ७५ किलोमीटर प्रतितास वेगाने धावते. बाईक स्वॅपेबल बॅटरीसह येते. त्याचा अर्थ असा की तिची बॅटरी संपली तरी सहज बदलत येते. दुसरीकडे ती चोरी झाल्यास त्यात डिटेक्शन आणि अॅक्सिडेंट डिटेक्शन सारखे इंटेलिजंट फिचर्सही आहेत. बूम मोटर्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) अनिरुद्ध नारायण रवी म्हणाले, की या इलेक्ट्रिक बाईकची भारतीय परिस्थिती विचारात घेऊन निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे ती देशात कोणत्याही हवामानात आणि कोणत्याही रस्त्यावर धावू शकते. कंपनीने ती चार रंगात ग्राहकांसाठी उपलब्ध करुन दिली आहे. यात व्हेल ब्लू, बीटल रेड, मँटिस ग्रीन आणि पँथर ब्लॅक रंगात लाँन्च केले आहे.

हेही वाचा: लाँच होताच 'Tata Punch'ने जिंकले ग्राहकांचे मन,कार बनली बेस्ट सेलर

उत्तम वाॅरंटी प्लॅन

कंपनीने बूम काॅर्बेटला चांगल्या वाॅरंटी प्लॅनसह लाँच केले आहे. तिच्या चेसिसवर ७ वर्षांची गॅरंटी आहे. दुसरीकडे बॅटरीवर कंपनी ५ वर्षांची स्टँडर्ड वाॅरंटी देत आहे. या सेगमेंट बॅटरी आणि चेसिसवर सर्वाधिक वाॅरंटी आहे.

किंमती किती ?

बूम काॅर्बेटला कंपनीने ८९ हजार ९९९ रुपये किंमतीत लाँच केले आहे. तिची बुकिंग १२ नोव्हेंबरपासून सुरु झाली आहे. केवळ ४९९ रुपयांत बुक करता येऊ शकते. लाँचवर इंट्रोडक्टरी ऑफरप्रमाणे कंपनी तिच्यावर तीन हजार रुपयांचे सूट (डिस्काऊंट) ही देत आहे. ग्राहकांना प्रत्यक्ष बाईक जानेवारीपासून मिळायला सुरुवात होईल.

loading image
go to top