"बॉटल कॅप' करून देणार पाणी पिण्याची आठवण!

वृत्तसंस्था
शनिवार, 19 नोव्हेंबर 2016

दिवसातून ठराविक वेळाने पाणी पिणे आरोग्यासाठी हितकारक असते. घरातील मोठ्या व्यक्ती किंवा डॉक्‍टर सतत हा सल्ला देत असतात. मात्र, अनेकांकडे पाणी पिण्याएवढा वेळ नसतो किंवा ते पाणी प्यायलाच विसरतात. अशांसाठी ही एक आनंदाची बातमी आहे. एका फ्रेंच कंपनीने पाणी प्यायची आठवण करून देणारी बाटली विकसित केली आहे. कंपनीने बाटलीला नेहमीसारखेच दिसणारे "विटेल रिफ्रेश कॅप' हे झाकण असून, त्यामध्ये "अलार्म' बसविला आहे. तुम्हाला किती वेळाने पाणी प्यायचे आहे, त्यानुसार तुम्ही अलार्म सेट करू शकता. बाटलीला झाकण बसविल्यानंतर तासाभराने झाकणावर असलेला छोटा झेंडा सरळ होतो आणि तुमचे लक्ष वेधतो. यामुळे तुम्हाला पाणी पिण्याची इच्छा होते का, याची कंपनीने चाचणी घेतली. यात लोकांनी दिवसभरात भरपूर पाणी प्यायल्याचे दिसून आले. या झाकणाच्या व्यावसायिक उत्पादनाबद्दल कंपनीने अद्याप काहीही स्पष्ट केले नाही.

Web Title: "Bottle watering will remember the Cap!