BSNL च्या 'या' ऑफरने Jio, Airtel ची वाढवली डोकेदुखी? |BSNL 5 GB daily plan will increase tension of Jio Airtel and Vodafone Idea | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

BSNL 5 GB daily plan will increase tension of Jio Airtel and Vodafone Idea
BSNL च्या 'या' ऑफरने Jio, Airtel ची वाढवली डोकेदुखी?

BSNL च्या 'या' ऑफरने Jio, Airtel ची वाढवली डोकेदुखी?

सरकारी BSNL ने टेलिकॉम सेक्टरमधील रथी महारथी Jio आणि Airtel यांची डोकेदुखी चांगलीच वाढवली आहे. बीएसएनलएलने आपला एक भन्नाट प्रीपेड प्लॅन लाँच केला आहे. यामुळे खासगी टेलिकॉम कंपन्या जियो, वोडाफोन आयडिया आणि एअरटेलची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. बीएसएनलने काही असे प्रीपेड प्लॅन्स लाँच केले आहेत की त्यामध्ये दिवशाला तब्बल 5GB डेटा मिळणार आहे. याचबरोबर या प्लॅनमध्ये अनलिमिटेड कॉलिंग, फ्री एसएमएस आणि बरेच फायदे मिळणार आहेत.

हेही वाचा: Jio मोठ्या धमाक्याच्या तयारीत, लवकरच लॉन्च होणार स्वस्त लॅपटॉप

BSNL चा 185 आणि 298 चा प्लॅन

बीएसएनएलचा 185 रूपयाच्या (STV_185) प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसाची वॅलिडिटी मिळेल. या प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 1GB डेटा, दिवसाला 100 एसएमएस फ्री याचबरोबर अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे. तर 298 रूपयाच्या प्लॅनमध्ये वरील सर्व सुविधा 56 दिवसांसाठी मिळतील.

BSNL चा 187 आणि 347 चा प्लॅन

Voice_187 या नावाच्या प्लॅनमध्ये तुम्हाला 28 दिवसाच्या वॅलिडिटीसह दिवसाला 2GB डेटा आणि 100 एसएमएस फ्री मिळतील. तसेच देशातील कोणत्याही नेटवर्कसाठी तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे. तर कंपनीच्या 347 यात सर्व ऑफर्स 56 दिवसासाठी मिळणार आहेत.

हेही वाचा: 56 दिवसांचे Jio, Airtel आणि Vi चे रिचार्ज प्लॅन, पाहा किंमत-फायदे

BSNL चा 299 आणि 247 चा प्लॅन

BSNL चा 299 (STV_299) प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 3GB डेटा मिळणार आहे. या प्लॅनची वॅलिडिटी ही 30 दिवस असणार आहे. यात दिवसाला 100 फ्री एसएमएस अनलिमिटेड कॉलिंग मिळणार आहे. तर 247 रूपयांच्या विशेष रिचार्जमध्ये तुम्हाल कोणत्याही डेली लिमिटशिवाय तब्बल 50GB अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 एसएमएस फ्री मिळमार आहे. तसेच या प्लॅनमध्ये तुम्ही EROS Now आणि BSNL Tune चे सब्सक्रिप्शन देखील मिळेल.

BSNL चा दिवसाला 5GB चा ढासू प्लॅन

BSNL ने फक्त 499 रूपयात दिवसाला 2GB डेटा सहित कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 फ्री एसएमएस देऊ केले आहेत. या प्लॅनची वॅलिडिटी हा तब्बल 90 दिवसांची असणार आहे. जर तुम्हाला दिवसाला 5GB डेटा हवा असेल तर तुम्हाला 599 चा रिचार्ज करावा लागले. याच प्लॅनमध्ये तुम्हाला रात्री 12 पासून सकाळी 5 वाजेपर्यंत अनलिमिटेड नाईट फ्री डेटा देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये तुम्हाला दिवसाला 100 फ्री SMS अनलिमिटेड कॉलिंग देखील मिळणार आहे.

Web Title: Bsnl 5 Gb Daily Plan Will Increase Tension Of Jio Airtel And Vodafone Idea

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top