

BSNL Freedom Offer
esakal
छत्रपती संभाजीनगर: स्वातंत्र्य दिनानिमित्त भारत संचार निगम लिमिटेडने (बीएसएनएल) ग्राहकांसाठी विविध डिजिटल सेवा, विशेष ऑफर्स आणि नेटवर्क विस्ताराची घोषणा केली आहे. मोबाइल ग्राहकांना परवडणाऱ्या दरात सेवा देतानाच देशभरातील ४ जी नेटवर्क अधिक सक्षम करण्यावर भर देण्यात आला आहे. याअंतर्गत १ 'फ्रीडम २.०' ऑफर, १,१११ चा फायबर ब्रॉडबँड प्लॅन, नवीन सेल्फकेअर अॅप तसेच मोफत मनोरंजन सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे.