BSNL : एकदाच रिचार्ज करा वर्षभर झंझट विसरा, मिळेल फ्री कॉलिंग, डेटा

Check BSNL Prepaid Plan Offer
Check BSNL Prepaid Plan Offer

BSNL Prepaid Plan : BSNL ने आपल्या प्रीपेड प्लॅन वापरकर्त्यांसाठी एक नवीन ऑफर लॉंच केली आहे. सरकारी दूरसंचार कंपनी भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने 2,399 रुपयांच्या प्रीपेड प्लॅनमध्ये एकूण 90 दिवसांची अतिरिक्त वैधता देण्याचा निर्णय घेतला आहे. इतकेच नाही तर 2,399 रुपयांच्या या प्रीपेड प्लॅनमध्ये अमर्यादित कॉलिंगसोबत दररोज 3GB डेटाही मिळतो. (Check BSNL Prepaid Plan Offer)

यापूर्वी या प्लॅनची ​​वैधता 365 दिवस होती, जी आता 455 दिवसांपर्यंत वाढणार आहे. म्हणजेच आता 12 महिन्यांऐवजी 15 महिने चालणार आहे. कंपनीने बीएसएनएल हरियाणाच्या ट्विटर हँडलवरून ही माहिती दिली आहे. यापूर्वी, या प्लॅनमध्ये 60 दिवसांच्या अतिरिक्त वैधतेसह एकूण 425 दिवसांची वैधता दिली जात होती. हा प्लॅन बीएसएनएल हरियाणा सर्कलने लॉन्च केला त्यामुळे हा प्लॅन इतर ठिकाणी हा उपलब्ध नसणे शक्य आहे.

ही लेटेस्ट ऑफर 15 जानेवारीपर्यंत वैध आहे. BSNL च्या 2,399 रुपयांच्या प्लॅनच्या इतर फायद्यांबद्दल बोलयचे झाल्यास, ग्राहकांना अमर्यादित लोकल आणि STD व्हॉईस कॉलिंग आणि 3GB डेटा दररोज दिला जातो. यासोबतच या प्लॅनमध्ये ग्राहकांना बीएसएनएल ट्यून्सचा देखील एक्सेस दिला जातो. याशिवाय, इरॉस नाऊ कंटेंट देखील या प्लॅनसह ग्राहकांना ऑफर केला जातो.

Check BSNL Prepaid Plan Offer
Jio चा सगळ्यात स्वस्त प्लॅन, 400 पेक्षा कमीत 84 दिवस व्हॅलिडिटी

365 दिवसांचा प्लॅन (365 Days Plan)

याव्यतिरिक्त, जर तुम्ही स्वस्त प्लॅन शोधत असाल तर BSNL च्या 1499 च्यां प्लॅनमध्ये देखिल 365 दिवसांची वैधता देण्यात येते. म्हणजेच तुम्ही वर्षभर रिचार्जच्या टेन्शनपासून मुक्त व्हाल. यामध्ये अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि एकूण 24 जीबी डेटा मिळणार आहे. याशिवाय दररोज 100 एसएमएसही दिले जात आहेत.

Check BSNL Prepaid Plan Offer
दुर्दैवी! अपघातात पती-पत्नी जागीच ठार; २२ तारखेला होतं मुलाचं लग्न

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com