दुर्दैवी! अपघातात पती-पत्नी जागीच ठार; येत्या २२ तारखेला होतं मुलाचं लग्न | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Husband and wife have been killed in a terrible  car and bike accident at Zodge

दुर्दैवी! अपघातात पती-पत्नी जागीच ठार; २२ तारखेला होतं मुलाचं लग्न

झोडगे (जि .नाशिक) : झोडगे गावा जवळ राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघात मोटरसायकल वरील पती-पत्नी जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना आज घडली. कार आणि मोटरसायकलच्या जोरदार धडकेत मोटरसायकलवर असलेले पती-पत्नी जागीच ठार झाले आहेत.

नाशिककडून धुळ्याकडे जाणारी फोर्ड कार क्रमांक एम.एच. २० ई. ई.८३९८ व शेंदुर्णी (नाळे) येथील मोटरसायकल क्रमांक एम. एच. ४१ ए. पी. २२४४ यांचा भीषण अपघात झाला. दरम्यान या अपघातात मोटरसायकलवर जात असलेले उत्तम भिका पिंजन (वय ५५) व शोभा उत्तम पिंजन (वय ५०) या दोघा पती-पत्नीं जागीच मृत्यू झाला.

हेही वाचा: नाशिक महापालिकेच्या ऑक्सिजन प्लांटसाठी पेसो परवाना

मुलगा १८ ला येणार होता परत

उत्तम पिंजन यांच्या मुलगा भुषण उत्तम पिंजन हा भारतीय लष्करात सेवेत असून पंजाब येथे कार्यरत आहे. त्यांचा विवाह येत्या २२ जानेवारी रोजी असल्याने विवाहाच्या धावपळीत पिंजन कुटुंब व्यस्त होते. यातच तर विवाहासाठी भुषण १८ जानेवारी रोजी गावी येणार असल्याने कुटुंबासह नातेवाईकांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. भुषणच्या मित्र परीवार विवाह समारंभाची आतुरतेने वाट पाहत असतानाच भुषणच्या आई-वडिलांचे अपघाती निधन झाल्याने शेंदुर्णी सह परीसरात शोककळा पसरली आहे…

हेही वाचा: सॅमसंगचा फ्लॅगशिप फीचर्स असलेला 5G स्मार्टफोन लॉन्च, पाहा किंमत

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Nashik
loading image
go to top