
भारत संचार निगम लिमिटेड (बीएसएनएल) ने स्वातंत्र्य दिनानिमित्त ग्राहकांसाठी एक आकर्षक ब्रॉडबँड योजना लाँच केली आहे. "फायबर रुबी ओटीटी" नावाच्या या नव्या प्लॅनमध्ये 1 gbpsच्या सुपरफास्ट इंटरनेट स्पीडसह तब्बल 9500 gb डेटा आणि 23 ओटीटी ॲप्सचा मोफत ॲक्सेस मिळणार आहे. या योजनेची घोषणा बीएसएनएलने त्यांच्या अधिकृत एक्स हँडलवर केली असून यामध्ये 1000 रुपयांपर्यंत सवलतही मिळत आहे. ही ऑफर 13 सप्टेंबर 2025 पर्यंत उपलब्ध आहे.