

BSNL 251 plan launched for students 100GB data unlimited voice calls 28 days validity
esakal
BSNL student recharge plan : बालदिनाच्या निमित्ताने सरकारी टेलिकॉम दिग्गज भारत संचार निगम लिमिटेड (BSNL) ने विद्यार्थ्यांसाठी खास भेट आणली आहे. कंपनीने 'स्टुडंट स्पेशल प्लॅन' (BSNL Student Special Plan) लाँच केला, जो विशेषतः Gen Z च्या गरजा लक्षात घेऊन तयार करण्यात आला आहे. हा प्लॅन मर्यादित काळासाठी उपलब्ध असून ऑनलाइन शिकण्याच्या युगात विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणार आहे. BSNLचे सीएमडी ए. रॉबर्ट जे. रवी यांनी सांगितले की, ही योजना विद्यार्थी आणि महिलांसाठी विशेष ऑफर्सचा भाग आहे. कंपनी 'मेक इन इंडिया' 4G (Make in India 4G) नेटवर्कच्या देशव्यापी विस्तारासोबत अशा योजनांना प्रोत्साहन देत आहे.