'या' कंपनीने ग्राहकांना दिला झटका, रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत वाढ; वैधता कमी | Recharge Plans | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Recharge Plans

Recharge Plans: 'या' कंपनीने ग्राहकांना दिला झटका, रिचार्ज प्लॅन्सच्या किंमतीत वाढ; वैधता कमी

BSNL Prepaid Recharge Plans: खासगी टेलिकॉम कंपन्या रिलायन्स जिओ, एअरटेल आणि वीआयने वेळोवेळी आपल्या प्रीपेड प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली आहे. सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएलने ठराविक प्लॅन्सच्या किंमतीत वाढ केली होती. मात्र, आता कंपनीने आपल्या प्लॅन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स कमी करत ग्राहकांना मोठा झटका दिला आहे.

BSNL ने आपल्या तीन प्लॅन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स कमी केली आहे. एकप्रकारे कंपनीने प्लॅन्सच्या किंमतीत वाढच केली आहे. BSNL ने २९ रुपये, ४९९ रुपये आणि ७९९ रुपयांच्या प्लॅन्समध्ये मिळणारे बेनिफिट्स कमी केली आहेत. तर ९९ च्या प्लॅन्सची वैधता २४ दिवसांवरून १८ दिवस केली आहे.

हेही वाचा: Best Smartphones: स्वस्त 5G स्मार्टफोन शोधताय? 12 हजारांच्या बजेटमधील 'हे' डिव्हाइस एकदा पाहाच

BSNL चा २६९ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या २६९ रुपयांच्या प्लॅनमध्ये तुम्हाला २८ दिवसांची वैधता मिळेल. याशिवाय, देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज २ जीबी डेटा, बीएसएनएल ट्यून, Eros Now चे सबस्क्रिप्शन आणि इतर बेनिफिट्स मिळतील. आधी या प्लॅन्समध्ये ३० दिवसांची वैधता दिली जात होती.

BSNL चा ४९९ रुपयांचा प्लॅन

या रिचार्ज प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज २ जीबी डेटासह देशभरात सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० मोफत एसएमएसची सुविधा दिली जाते. अतिरिक्त बेनिफिट्सबद्दल सांगायचे तर यात BSNL ट्यून, Zing आणि गेमिंग बेनिफिट्स मिळतील. या प्लॅनमध्ये ७५ दिवसांची वैधता दिली जाते. आधी प्लॅनमध्ये ९० दिवसांची वैधता दिली जात होती.

हेही वाचा: Hyundai Motors: कन्फर्म! 'या' तारखेला येतेय Hyundai ची नवी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 600KM धावणार

BSNL चा ७६९ रुपयांचा प्लॅन

BSNL च्या या प्लॅनमध्ये यूजर्सला दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० मोफत एसएमएस दिले जातात. या प्लॅनमध्ये आधी ९० दिवसांची वैधता दिली जात होती. परंतु, आता ८४ दिवसांची वैधता मिळेल. यामध्ये अतिरिक्त बेनिफिट्स देखील दिले जातात.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

टॅग्स :BSNLrechargemega recharge