कन्फर्म! 'या' तारखेला येतेय Hyundai ची नवी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 600KM धावणार | Hyundai Motors | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hyundai Ioniq 5

Hyundai Motors: कन्फर्म! 'या' तारखेला येतेय Hyundai ची नवी इलेक्ट्रिक कार, सिंगल चार्जमध्ये 600KM धावणार

Hyundai Ioniq 5 EV Launch Soon: Hyundai Motors आपली नवीन इलेक्ट्रिक एसयूव्ही Hyundai Ioniq 5 ला ११ जानेवारीला लाँच करणार आहे. ही कार लाँचिंगनंतर Kia EV6 ला टक्कर देईल. कंपनीने कारचे बुकिंग सुरू केले असून, 2023 Auto Expo मध्ये गाडीच्या किंमतीची घोषणा केली जाईल.

Hyundai Ioniq 5 electric SUV चे बुकिंग तुम्ही कंपनीची अधिकृत वेबसाइट अथवा जवळील ह्यूंडाई डीलरशीपच्या माध्यमातून करू शकता. बुकिंगसाठी १ लाख रुपये टोकन रक्कम द्यावी लागेल. कंपनी या गाडीला Beyond Mobility World थीम अंतर्गत ऑटो एक्स्पो २०२३ मध्ये सादर करेल. कारच्या ड्राइव्हिंग रेंज, बॅटरी, फीचर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: Phone Hack: तुमचा फोन तर हॅक झाला नाही ना? 'हे' संकेत दिसत असल्यास त्वरित घ्या खबरदारी

Hyundai Ioniq 5 electric SUV मध्ये मिळेल जबरदस्त फीचर्स

कंपनीने या एसयूव्हीमध्ये ७२.६ kWh क्षमतेचा बॅटरी पॅक दिला असून, जो २१४ बीएचपी पॉवर आणि ३५० एनएम पीक टॉर्क जनरेट करतो. बॅटरी चार्जिंगसाठी कंपनीने नियमित चार्जरसह फास्ट चार्जरचा सपोर्ट दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, 350 kW DC चार्जरने चार्ज केल्यास बॅटरी अवघ्या १८ मिनिटात ० ते ८० टक्के चार्ज होते.

हेही वाचा: Online Shopping: फ्लिपकार्टला दणका! वेळेवर डिलिव्हरी न केल्याने ठोठावला ४२ हजारांचा दंड

Ioniq 5 electric SUV ची ड्राइव्हिंग रेंज

कंपनीचा दावा आहे की एकदा चार्ज केल्यावर या गाडी सहज ६३१ किमी अंतर पार करू शकते. गाडीच्या टॉप स्पीडबाबत कंपनीने अद्याप माहिती दिलेली नाही.

कारमध्ये मिळणाऱ्या फीचर्सबद्दल सांगायचे तर यामध्ये १२.३ इंच डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, बोसचे ८ स्पीकर साउंड सिस्टम, वायरलेस चार्जिंग, रेन सेंसिंग वायपर, 12.3 इंचाचा टचस्क्रीन इंफोटेनमेंट सिस्टम, नेव्हिगेशन, ऑटो डिफॉगर, पॉवर टेल गेटसह अनेक शानदार फीचर्स मिळतील.

हेही वाचा: ..तर तुम्हालाही मिळू शकेल इन्कमटॅक्सचा जुना रिफंड

टॅग्स :carAutomobilehyundai