Recharge plan : १९७ रुपयांच्या प्लॅनमध्ये मिळेल अमर्यादित कॉलिंग आणि डेटा

दूरसंचार कंपन्यांमध्ये बीएसएनएल २०० रुपयांपेक्षा कमी दरात चांगला प्लॅन देत आहे.
Recharge plan
Recharge planGOOGLE

मुंबई : आजच्या काळात कॉलिंग आणि डेटाचा वापर वाढला आहे, ज्यामुळे स्वतःसाठी विशिष्ट योजना शोधणे हे एक मोठे आव्हान आहे. त्यातच कंपन्या त्यांच्या ग्राहकांसाठी विशेष योजना आणत आहेत.

यामध्ये रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडिया, बीएसएनएल यांचा समावेश आहे. या कंपन्या वापरकर्त्यांना कमी किंमतीत अधिक वैधता आणि जबरदस्त ऑफर देत आहेत. या दूरसंचार कंपन्यांमध्ये बीएसएनएल २०० रुपयांपेक्षा कमी दरात चांगला प्लॅन देत आहे.

Recharge plan
जिओच्या ३ रिचार्ज प्लॅनच्या किंमतींत वाढ; असे आहेत तपशील

BSNL चा 197 रुपयांचा प्लॅन :

BSNL च्या या प्लानची किंमत 197 रुपये आहे. यासोबत 100 दिवसांची वैधता दिली जात आहे. अशा योजना बाजारात क्वचितच उपलब्ध असतात, ज्यांची किंमत 200 रुपयांपेक्षा कमी असते आणि 100 दिवसांची वैधता असते.

रिलायन्स जिओ, एअरटेल, व्होडाफोन आयडियाच्या तुलनेत कंपनी अधिक फायदे देत आहे. यामध्ये कंपनी यूजर्सना अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा देत आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींशी किंवा कुटुंबियांशी मनापासून बोलू शकता.

त्याचबरोबर अनलिमिटेड डेटा दिला जात आहे. दररोज 2 GB डेटा वापरल्यानंतर, इंटरनेटचा वेग 40 Kbps होईल. यासोबतच दररोज १०० एसएमएस दिले जात आहेत. हे सर्व फायदे फक्त 18 दिवसांसाठी दिले जातील. यासोबत ZING सबस्क्रीप्शन दिले जात आहे.

Recharge plan
Jio, Airtel अन् Vi चे 200 रुपयांत बेस्ट रिचार्ज प्लॅन, वाचा सविस्तर

वास्तविक, बीएसएनएल ही एक सरकारी कंपनी आहे. ही कंपनी आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विशेष योजना ऑफर करत असते, जेणेकरून ग्राहकांना जास्तीत जास्त फायदा मिळू शकेल. BSNL व्यतिरिक्त, Jio-Airtel-Vi बाजारात आहे. या कंपन्यांकडे अद्याप या फायद्याची कोणतीही योजना नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com