Jio recharge | ३ महिन्यांच्या प्लॅनमध्ये १५० रुपयांची सूट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jio recharge

Jio recharge : ३ महिन्यांच्या प्लॅनमध्ये १५० रुपयांची सूट

मुंबई : जिओ रिचार्ज नेहमीच चर्चेत असतात. कंपनी वेळोवेळी रिचार्ज प्लॅनमध्ये बदल करत असते. पण जर तुम्हाला कोणी सांगितले की जिओच्या प्लॅनवर मोठ्या प्रमाणात सूट आहे, तर तुम्ही त्यावर विश्वास ठेवाल का ? पण ते शक्य आहे. जिओ रिचार्जवर तुम्हाला सहज सूट मिळेल. यासाठी तुम्हाला फार काही करण्याचीही गरज नाही.

हेही वाचा: जिओच्या ३ रिचार्ज प्लॅनच्या किंमतींत वाढ; असे आहेत तपशील

Jio ने 84 दिवसांसाठी नवीन प्लान लाँच केला आहे. कंपनीने याचे नाव Jio 666 प्रीपेड प्लान ठेवले आहे. पेटीएमवर बंपर ऑफर सुरू आहे. तुम्ही या ऑफर अंतर्गत रिचार्ज खरेदी केल्यास तुम्हाला खूप मोठी सूट देखील मिळू शकते.

हेही वाचा: JIOचे जबरदस्त प्रीपेड प्लॅन्स; ३३६ दिवसांच्या वैधतेसह डेटा, कॉलिंग आणि एसएमएस

जिओ वापरकर्त्यांना प्रोमो कोड मिळत आहे-

तुम्हाला यात सूट कशी मिळेल ? यासाठी तुम्हाला एक प्रोमो कोड लागेल. पण प्रोमो कोडच्या यादीत फक्त तेच दिसतील ज्यांच्या नंबरवर ही ऑफर लागू होईल. ज्यांच्या नंबरवर ही ऑफर लागू होणार नाही ते यादीत दिसणार नाहीत. यासाठी तुम्ही प्रथम प्रोमो कोड लिस्ट पाहावी. Jio ने आपल्या यूजर्ससाठी एक नवीन ऑफर आणली आहे.

तुम्हाला Jio 666 प्रीपेड प्लॅनमध्ये 84 दिवसांची वैधता मिळते. यासोबतच तुम्हाला अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, या प्लानची खासियत म्हणजे यामध्ये दररोज 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय या प्लॅनमध्ये तुम्हाला दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. हे रिचार्ज केल्यानंतर तुम्हाला ३ महिने रिचार्ज करण्याची गरज नाही.

Web Title: Jio Recharge 150 Rupees Discount On 3 Months Plan

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Jio