BSNL चा 599 रुपयांचा प्रीपेड प्लॅन; 84 दिवस दररोज मिळतो 5GB डेटा

BSNL
BSNL Sakal

BSNL Vs Airtel Vs Vi Vs Jio : देशातील मोठ्या टेलिकॉम कंपन्यांनी अलीकडेच त्यांच्या रीचार्ज प्लॅनच्या किंमतींमध्ये मध्ये वाढ केली आहे. मात्र बीएसएनएलने आपल्या रिचार्ज प्लॅनमध्ये कोणताही बदल केलेले नाहीत. BSNL च्या अनेक प्लॅन आहेत, जे Airtel आणि Vodafone Idea ला मागे टाकतात आज आपण अशाच BSNL च्या 599 रुपयांच्या प्लॅनबद्दल जाणून घेऊया.

BSNL चा 599 रुपयांचा प्लॅन

बीएसएनएलच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये युजरला 84 दिवसांची वैधता मिळते. या प्लॅनमध्ये दररोज 5GB डेटा मिळतो, जो कोणत्याही प्लॅनपेक्षा जास्त आहे. प्लॅनमध्ये कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि दररोज 100 एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला या रिचार्जमध्ये झिंग अॅपचे सबस्क्रिप्शन देखील मिळेल.

Airtel चा 599 रुपयांचा प्लॅन

एअरटेलच्या 599 रुपयांच्या प्लॅनमध्ये केवळ 28 दिवसांची वैधता उपलब्ध आहे. प्लॅनमध्ये 28 दिवसांसाठी दररोज 3GB डेटा मिळेल. मनोरंजनासाठी या प्लॅनमध्ये तुम्हाला Disney + Hotstar चे सबस्क्रिप्शन मिळेल. याशिवाय, सर्व नेटवर्कवर दररोज अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दिले जातात. याशिवाय तुम्हाला या रिचार्जमध्ये Amazon Prime Mobile Edition फ्री ट्रायल, Wynk Music आणि HelloTunes फ्री सबस्क्रिप्शन मिळेल.

BSNL
आसामच्या 'मनोहारी गोल्ड' चहाला सोन्याचा भाव! किलोसाठी विक्रमी बोली

Vi चा 599 रुपयांचा प्लॅन

Vi चा 599 रुपयांचा प्लॅन 70 दिवसांच्या वैधतेसह येतो. या प्लॅनमध्ये ग्राहकांना 1.5GB डेटा मिळतो. याशिवाय दररोज कोणत्याही नेटवर्कवर अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस उपलब्ध आहेत. याशिवाय तुम्हाला या रिचार्जमध्ये Binge All Night, Weekend Data Rollover आणि Vi Movies आणि TV चा फ्री एक्सेस मिळतो.

Jio चा 533 रुपयांचा प्लॅन

जिओचा 599 रुपयांचा कोणताही प्लॅन नाही. पण त्यांचा 533 रुपयांचा प्लॅन आहे, जो 56 दिवसांच्या वैधतेसह येतो. यामध्ये यूजरला दररोज 2 जीबी डेटा मिळतो. याशिवाय अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस दररोज उपलब्ध आहेत. यासह, मनोरंजनासाठी Jio अॅप्सचा फ्री एक्सेस उपलब्ध आहे.

BSNL
रेडमीचा 5G फोन भारतात लॉंच; स्वस्तात मिळतायेत भन्नाट फीचर्स

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com