स्वस्तात घरी घेऊन जा आयफोन, हजारो रुपयांची मिळत आहे सूट|iPhone 14 offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

iPhone 14

iPhone 14 offer: स्वस्तात घरी घेऊन जा आयफोन, हजारो रुपयांची मिळत आहे सूट

Huge Discount On iPhone 14: Apple ने काही दिवसांपूर्वीच iPhone 14 लाँच केले आहे. हा कंपनीचा लेटेस्ट फ्लॅगशिप स्मार्टफोन आहे. कंपनीने आयफोन १४ ला ७९,९०० रुपये सुरुवाती किंमतीत लाँच केले होते. तुम्ही जर जास्त किंमतीमुळे आयफोन खरेदी करणे टाळत असाल, तर काळजी करण्याचे कारण नाही. आयफोन १४ वर आता बंपर डिस्काउंट उपलब्ध आहे. ऑफर अंतर्गत तुम्ही आयफोन १४ ला स्वस्तात खरेदी करू शकता.

हेही वाचा - मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार....

तुम्ही iPhone 14 ला ई-कॉमर्स साइट Amazon वरून स्वस्तात खरेदी करू शकता. फोनचे १२८ जीबी स्टोरेज मॉडेल ७८,४०० रुपये किंमतीत उपलब्ध आहे. तुम्ही एचडीएफसी बँकेच्या क्रेडिट आणि डेबिट कार्डचा वापर केल्यास ५ हजार रुपये अतिरिक्त डिस्काउंटचा फायदा मिळेल.

बँक डिस्काउंटचा फायदा मिळाल्यास आयफोन १४ ची किंमत ७३,४०० रुपये होईल. या व्यतिरिक्त फोनवर १६,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर देखील उपलब्ध आहे. ही ऑफर तुमच्या जुन्या फोनच्या लेटेस्ट मॉडेलवर अवलंबून आहे. ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास आयफोन १४ फक्त ५७,१०० रुपयात तुमचा होईल.

हेही वाचा: Twitter: आधी कर्मचाऱ्यांना काढले बाहेर, आता ट्विटर यूजर्सला चक्क 'जेल'मध्ये पाठवणार मस्क

Apple iPhone 14 चे स्पेसिफिकेशन्स

नवीन आयफोन हे जुन्या मॉडेल्सच्या तुलनेत अनेक नवीन फीचर्ससह येतात. नवीन मॉडेलमध्ये ए१५ बायोनिक चिपसेट ६-कोर सीपीयू आणि शानदार जीपीयू देण्यात आला आहे. कंपनीचा दावा आहे की, आधीच्या तुलनेत चांगले ग्राफिक्स मिळतील. आयफोन १४ मध्ये ६.१ इंच ओलेड स्क्रीन देण्यात आली आहे. तर आयफोन १४ प्लसमध्ये ६.७ इंच स्क्रीन मिळते.

iPhone 14 आणि iPhone 14 Plus मध्ये तुम्हाला शानदार कॅमेरा मिळेल. यात १२ मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा दिला आहे. कंपनीचा दावा आहे की, याद्वारे कमी प्रकाशात देखील चांगली फोटोग्राफी करू शकता. हे सेंसर स्टेबलाइजेशन सपोर्टसह येतात. याद्वारे चांगले व्हीडिओ काढण्यास मदत मिळेल.

टॅग्स :appleiphoneApple iphone