जबरदस्त! महागडा लॅपटॉप मिळतोय अवघ्या १० हजारात, ऑफर-किंमत एकदा पाहाच | Laptop Offer | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Laptop

Laptop Offer: जबरदस्त! महागडा लॅपटॉप मिळतोय अवघ्या १० हजारात, ऑफर-किंमत एकदा पाहाच

Offer On Infinix InBook X1: तुमच्याकडे स्मार्टफोनप्रमाणेच लॅपटॉप देखील असणे गरजेचे आहे. ऑफिसच्या कामापासून ते कॉलेजच्या प्रोजक्टपर्यंत प्रत्येक कामासाठी लॅपटॉप उपयोगी येतो. परंतु, अनेकदा किंमत जास्त असल्याने आपण लॅपटॉप खरेदी करत नाही. तुम्ही जर स्वस्त लॅपटॉप खरेदी करण्याचा विचार करत असाल तर Infinix InBook X1 वर आकर्षक ऑफर उपलब्ध आहे. १४ इंचाच्या या लॅपटॉपची मूळ किंमत ३९,९९० रुपये आहे. परंतु, तुम्ही १० हजारांच्या बजेटमध्ये खरेदी करू शकता. इनफिनिक्सच्या या लॅपटॉपवरील ऑफरविषयी सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Infinix INBook X1 Neo Series वर डिस्काउंट ऑफर

Infinix INBook X1 Neo Series च्या १४ इंच लॅपटॉपची मूळ किंमत ३९,९९० रुपये आहे. परंतु, ४२ टक्के डिस्काउंटनंतर फक्त २२,९९० रुपयात उपलब्ध आहे. या लॅपटॉपवर १२,३०० रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफरचा देखील फायदा मिळेल. मात्र, ही ऑफर तुमच्या जुन्या लॅपटॉपच्या कंडिशन आणि मॉडेलवर उपलब्ध आहे. या ऑफरचा पूर्ण फायदा मिळाल्यास लॅपटॉप फक्त १०,६०० रुपयात उपलब्ध होईल.

तसेच, १,२५० रुपये बँक डिस्काउंटनंतर लॅपटॉपला फक्त ९,४४० रुपयात खरेदी करू शकता. Infinix INBook X1 Neo ला दरमहिना ३,८३२ रुपये देऊन ईएमआयवर देखील खरेदी करता येईल. तसेच, यावर १ वर्षाची वॉरंटी देखील मिळते.

हेही वाचा: FIFA World Cup मध्ये Google चाही 'गोल', २५ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं असं...

स्पेसिफिकेशन्स

Infinix INBook X1 Neo लॅपटॉपमध्ये १४ इंच फुल फुल एचडी आयपीएस डिस्प्ले देण्यात आला असून, याची पीक ब्राइटनेस लेव्हल ३०० निट्स आहे. यात ११ तासांचा बॅटरी बॅकअप मिळतो. तसेच, ४५ वॉट एसी अ‍ॅडॉप्टरचा सपोर्ट मिळतो. हा लॅपटॉप २५६ जीबी स्टोरेज आणि ८ जीबी रॅमसह येतो.

यात Intel Celeron Quad Core N5100 प्रोसेसरचा सपोर्ट मिळेल. लॅपटॉप Windows 11 Home ऑपरेटिंग सिस्टमवर काम करतो. याचे डायमेंशन ३२३.३x२११.१x१४.८mm आणि वजन १.२४ किलो आहे.

हेही वाचा: Online Payment: UPI वरून चुकीच्या बँक खात्यात ट्रान्सफर झाले पैसे? रिफंडसाठी फॉलो करा ही प्रोसेस

टॅग्स :saleLaptop