
iPhone 15 discount offer amazon sale
esakal
Apple iPhone Discount Offer : स्मार्टफोनप्रेमींसाठी एक धक्कादायक बातमी आहे. अॅपलच्या लोकप्रिय आयफोन 15 मॉडेलवर आतापर्यंतची सर्वात मोठी किंमत कपात होतेय. अमेझॉनच्या येणाऱ्या ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये हा फोन केवळ ४५ हजार रुपयांखाली उपलब्ध होणार आहे. जेव्हा तो पहिल्यांदा बाजारात आला तेव्हा ७९,९०० रुपयांपासून सुरू होणाऱ्या या फोनची किंमत आता ३७,००० रुपयांनी घसरली आहे. ही संधी चुकवू नका.