फक्त ८४ हजारात खरेदी करा २ लाखांची KTM 200 Duke स्पोर्ट्स बाईक

टु-व्हिलर विभागात स्पोर्ट्स बाईकमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत.
KTM 200 Duke
KTM 200 Dukeesakal

टु-व्हिलर विभागात स्पोर्ट्स बाईकमध्ये विविध प्रकार उपलब्ध आहेत. यात बजाज, हिरो, यामाहा सुझुकी आदी कंपन्या पुढे दिसतात. केटीएम ड्युक २०० स्पोर्ट्स (KTM 200 Duke) बाईकविषयी सांगणार आहोत. ती आपली गती आणि आकर्षक डिझाईनसाठी ओळखली जाते. जर तुम्ही ही बाईक शोरुममधून खरेदी करत असाल तर तुम्हाला १.८५ लाख रुपये खर्च करावे लागतील. जर तुमच्याकडे एवढे मोठे बजेट नसेल तर जाणून घ्या ही बाईक निम्म्यापेक्षा कमी किंमतीत कशी खरेदी कराल. ऑफरविषयी जाणून घेण्यापूर्वी या बाईकचे फिचर्स आणि स्पेसिफिकेशनच्या प्रत्येक तपशील..

केटीएम ड्यूकमध्ये कंपनीने १९९.५ सीसीचे सिंगल इंजिन दिले आहे. जे २५.८३ पीएसची पाॅवर आणि १९.५ एनएमचे पीक टाॅर्क जनरेट करते. त्या बरोबर ६ स्पीड गिअरबाॅक्स दिले आहे.

बाईकच्या ब्रेकिंग सिस्टिममध्ये कंपनीने तिचे फ्रंट आणि रिअर दोन्ही व्हिलमध्ये डिस्क ब्रेकसह ड्युअल चॅनल एबीएस सिस्टिम लावण्यात आले आहे. बाईकच्या मायलेजबाबत कंपनीने दावा केला आहे, की केटीएम २०० ड्यूक ३५ किलोमीटर प्रतिलीटरचे मायलेज देते.

KTM 200 Duke
Hero Electric च्या स्कूटरवर मिळतेय 5 वर्षांची वॉरंटी

केटीएम २०० ड्यूकचे तपशील जाणून घेतल्यानंतर आता जाणून घेऊया की ही बाईक निम्म्या किंमतीत कशी खरेदी करता येईल?

- या बाईकवर ऑफर देऊ केले आहे सेकंड हँड बाईक खरेदी-विक्री करणारे संकेतस्थळ BIKES24ने. ही बाईक संकेतस्थळावर लिस्ट केली असून तिची किंमत ८४ हजार रुपये ठेवण्यात आली आहे.

- संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, या बाईकचे माॅडल २०१५ चे असून तिचे ऑनरशीप फर्स्ट आहे. बाईक आतापर्यंत ४७ हजार ५०७ किलोमीटर धावली आहे. तिची नोंदणी दिल्लीचे डीएल ०१ आरटीओ कार्यालयात केले आहे. ही बाईक खरेदी केल्यावर कंपनी काही अटींवर १ वर्षाची वाॅरंटी देत आहे. त्याबरोबर सात दिवसांची मनी बॅक गॅरंटी ही दिली जाईल. या मनी बॅक गॅरंटीनुसार, ही बाईक खरेदीच्या सात दिवसात पसंत न आल्यास तुम्ही ती कंपनीला वापस करु शकता. त्यानंतर कंपनी तुम्हाला तुमचे पूर्ण पेमेंट परत करेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com