Hero Electric च्या स्कूटरवर मिळतेय 5 वर्षांची वॉरंटी

टीम ई सकाळ
Saturday, 16 January 2021

हिरो इलेक्ट्रिकची राजस्थाममध्ये 50 अंश सेल्सियस तापमानात चाचणी केली होती. अशा वातावरणातही गाडी चांगली चालली.

नवी दिल्ली - हिरो इलेक्ट्रिकने त्यांच्या लिथियम आयन रेंजच्या इलेक्ट्रिक स्कूटरला पाच वर्षांची वॉरंटी देण्याची घोषणा केली आहे. ही वॉरंटी स्कूटरची बॅटरी आणि चार्जर वगळता इतर गोष्टींसाठी असेल. हिरोच्या इलेक्ट्रिक स्कूटरवर सध्या ठराविक कालावधीत या ऑफरचा लाभ घेता येणार आहे. पेट्रोलच्या वाढत्या किंमतीमुळे इलेक्ट्रिक स्कूटर घेण्याकडे ग्राहकांचा कल आहे. 

हिरोने ही ऑफर 1 जानेवारी ते 31 मार्च 2021 या काळात खरेदी करणाऱ्यांसाठी दिली आहे. हिरो इलेक्ट्रिकचे म्हणणे आहे की, ग्राहकांच्या प्रतिसादाच्या आधारवर लिथियम आयन बॅटरीवर चालणाऱ्या स्कूटरवरील ऑफर कायम करण्याचा विचार करू. 

इलेक्ट्रिक स्कूटरच्या चाचणीबद्दल सांगताना कंपनीचे सीईओ सोहिंदर गिल यांनी सांगितलं की, ही ऑफर ग्राहकांमध्ये या गाडीबद्दल विश्वास निर्माण करेल. हिरो इलेक्ट्रिकची राजस्थाममध्ये 50 अंश सेल्सियस तापमानात चाचणी केली होती. अशा वातावरणातही गाडी चांगली चालली. सध्या पेट्रोल डिझेलचे दर वाढत आहेत. अशा वेळी ग्राहकांना ही गाडी नक्कीच आकर्षित करेल. कारण या स्कूटरचा खर्च पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्यांपेक्षा नक्कीच कमी असेल. 

हे वाचा - सुरक्षिततेचं भान तुम्ही बाळगता का?

तरुणाईमध्येही पर्यावरणपूरक वाहने वापरण्याचं प्रमाण वाढत आहे. हिरो इलेक्ट्रिकने स्वत:ची वेगळी ओळख तयार केली आहे. तर कंपनी आता देत असलेल्या ऑफरमुळे ग्राहकांची संख्याही वाढेल असा विश्वास हिरोच्या एका डिलरने केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hero electric scooter offer 5 year warranty