Pune: भारतीयांच्या ‘जैविक डेटा’ ला सुरक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

CDAC

Science day: भारतीयांच्या ‘जैविक डेटा’ ला सुरक्षा, आलं ‘सी-डॅक’चे खास सॉफ्टवेअर

पुणे - प्राणी, वनस्पती, सूक्ष्मजीव आणि माणसांचा जैविक डेटा ही राष्ट्रीय सुरक्षेची बाब आहे. आजवर भारतीयांच्या जनुकीय डेटापासून ते सूक्ष्मजीवांच्या वैद्यकीय डेटापर्यंतची माहिती ही एका खुल्या बॅंकेप्रमाणे वापरली जात असून,

त्याच्या सुरक्षिततेसाठी प्रगत संगणन अध्ययन केंद्राने (सी-डॅक) स्वदेशी सॉफ्टवेअर्सची निर्मिती केली आहे.

‘सी-डॅक’च्यावतीने राष्ट्रीय विज्ञान दिनी ‘इंटिग्रेटेड कंप्युटिंग क्लाउड’ (आयसीई) आणि ‘मॉलिक्यूलर डायनॅमिक व्हिज्युअलायझेशन ॲँड ॲनॅलिसिस टूल’चे (डीपीसीआयटी) अनावरण करण्यात येणार आहे.

सोमवारी झालेल्या पत्रकार परिषदेत महासंचालक ई. मंगेश, वरिष्ठ संचालक डॉ. राजेंद्र जोशी यांनी यासंबंधीची माहिती दिली. यानिमित्त तीन दिवसीय ‘ॲक्सलरेटिंग बायोलॉजी’ या परिषदेचेही आयोजन केले आहे.

देशातील वैद्यकीय डेटाचे संकलन, विश्लेषण आणि संशोधनासाठी एक स्वदेशी प्लॅटफॉर्म सी-डॅकच्या बायोइन्फॉर्मेटिक ग्रुपने विकसित केला आहे.

गरज काय?

भारतातील जैविक डेटा अत्यंत क्लिष्ट

सध्या असुरक्षित पद्धतीने डेटा साठविला आणि वापरला जातो

भारत केंद्रित संशोधन आणि उत्पादनांसाठी क्लाउड कंप्युटिंगची गरज

जागतिक स्तरावर भारताची सामरिक भूमिका वाढत चालली आहे

इंटिग्रेटेड कंप्युटिंग क्लाउड (आयसीई)

जनुकीय डेटासाठी क्लाउड कंप्युटिंगवर आधारित प्रणाली म्हणजे आयसीई होय. भारतातील जनुकीय डेटाचे संकलन, विश्लेषण आणि वापरासाठी याची निर्मिती केली आहे. सी-डॅकच्या माध्यमातून कंप्युटिंग सुविधा, स्टोअरेज आणि विश्लेषण सुविधा उपलब्ध केली जाणार.

वैशिष्ट्ये

वापरकर्त्याला स्वदेशी सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरद्वारे सुरक्षित डेटा साठविता येणार

आवश्यकतेनुसार कंप्युटिंग सुविधा उपलब्ध होणार

नेक्स्ट जनरेशन सिक्वेंसिंगसाठी माहितीचे विश्लेषण शक्य

फायदे

आरोग्यसेवा, कृषी, पशुधन आणि पर्यावरण क्षेत्रातील स्वदेशी संशोधनासाठी जैविक डेटाचा एक सुरक्षित व सक्षम पर्याय उपलब्ध

टॅग्स :Pune NewsscienceData