esakal | Amazon-Flipkart ला स्वदेशी अॅप देणार टक्कर; जाणून घ्या Bharat e Market बद्दल सर्वकाही
sakal

बोलून बातमी शोधा

Amazon-Flipkart ला स्वदेशी अॅप देणार टक्कर; जाणून घ्या Bharat e Market बद्दल सर्वकाही

या अॅपवर मिळणार स्वस्तात सामान, आजच करा खरेदी 

Amazon-Flipkart ला स्वदेशी अॅप देणार टक्कर; जाणून घ्या Bharat e Market बद्दल सर्वकाही

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

सध्या जगभरात ऑनलाईन खरेदीचा बोलबाला आहे. भारतात अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, मिंत्रा यासारख्या अनेक ऑनलाईन साईट्सवरून मोठ्या प्रमाणात खरेदी होते. जगात सर्वाधिक चलती अलिबाबाची आहे. पण आता अलिबाबालाही मागे टाकेल असं आपलं देसी पोर्टल लाँच झालं आहे. होय! महाशिवरात्रीच्या मुहूर्तावर देसी ई-कॉमर्स संकेतस्थळ Bharat e Market भारतीयांच्या भेटीला आलं आहे. या संकेतस्थळाकडून अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्ट यासारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळाला तगडी टक्कर मिळण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कॉन्फेडरेशन ऑफ आल इंडिया ट्रेडर्स(CAIT) ने Bharat e Market हे अॅप गुरुवारी दिल्लीमध्ये लाँच केलं आहे. 

त्यामुळे आता ऑनलाइन खरेदीसाठी तुम्हाला आता फक्त अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसारख्या ई-कॉमर्स संकेतस्थळावर अवलंबून राहण्याची गरज नाही. जवळपास ८ कोटी व्यापाऱ्यांची संघटना असलेल्या CAIT ने वेन्डर मोबाइल अ‍ॅप Bharat e Market भारताच्या ई मार्केटमध्ये लाँच केलं आहे. हे पूर्णपणे मेड इंडिया ई-कॉमर्स संकेतस्थळ आहे.  या संकेतस्थळावर सध्या सात लाखांपेक्षा जास्त विक्रेते Bharat e Market या संकेतस्थळावर आहेत. याचाच अर्थ तुमच्या सगळ्या गरजा भागवणा-या वस्तू एका क्लिकवर मिळू शकतील.

पुढील दोन वर्षांत जवळपास एक कोटींपेक्षा जास्त विक्रेत्यांना Bharat e Market या संकेतस्थळासोबत जोडण्य़ात येणार आहे. जगातील सर्वात मोठ्या इ-कॉमर्स संकेतस्थळावर म्हणजेच अलिबाबासोबत ८० लाख विक्रेते आहेत. अ‍ॅमेझॉनसोबत पाच लाख तर फ्लिपकार्टसोबत एक लाख ५० हजार विक्रेते जोडलेले आहेत. Bharat e Market ही भारतीयांसाठी एक हक्काची बाजारपेठ आहे.

Bharat e Market या संकेतस्थळाचं आणखी एक मोठं वैशिष्ट्य म्हणजे,  या संकेतस्थळावर चिनी वस्तूंना अजिबात थारा नसेल. या  कोणत्याही विदेशी वस्तूंना थारा नसल्यामुळे हे पूर्णपणे स्वदेशी अॅप आहे. शिवाय हे पोर्टल अत्याधुनिक तंत्रज्ञानानं बनवण्यात आल्याचेही Bharat e Market कडून सांगण्यात आलं आहे. यात वस्तूंची गुणवत्ता, सोप्या पद्धतीनं खरेदी प्रक्रीया आणि लवकरात लवकर वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचवण्यावर भर देण्यात येणार आहे. त्यामुळे हे संपूर्ण स्वदेशी पोर्टल अलिबाबालाही मात देईल यात शंका नाही.
 

loading image
go to top