VI च्या २ कोटीहून अधिक ग्राहकांचा डेटा उघड्यावर? तुमचं सिम कोणतं? | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vi Plans
VI च्या २ कोटीहून अधिक ग्राहकांचा डेटा उघड्यावर? तुमचं सिम कोणतं?

VI च्या २ कोटीहून अधिक ग्राहकांचा डेटा उघड्यावर? तुमचं सिम कोणतं?

सायबर सुरक्षेबाबत संशोधन करणारी संस्था सायबर एक्स ९ कडून धक्कादायक माहिती समोर आली आहे. VI या टेलिकॉम कंपनीच्या सिस्टममध्ये असलेल्या काही गोंधळांमुळे २ कोटी ग्राहकांचा कॉल डेटा उघड्यावर पडला आहे.कधी, कोणी, कोणाला फोन केला, किती वेळ बोलणं झालं, हे सगळंच्या सगळं आता जाहीर झालं आहे.

VI ची पोस्टपेड सेवा घेतलेल्या ग्राहकांचा डेटा आता धोक्यात आला आहे. फोन कुठून केला, कोणाला केला, ज्याला फोन केला त्याचं लोकेशन, ग्राहकाचं पूर्ण नाव, पत्ता, मेसेजेसचे डिटेल्स असा सगळा डेटा या सिस्टममधल्या चुकीमुळे उघडा पडला आहे. या सायबर एक्स ९ चे संस्थापक आणि संचालक हिमांशू पाठक यांनी सांगितलं की आपण व्होडाफोन इंडियाला आपल्या कंपनीचा अहवाल मेलवरुन पाठवला आहे.

पाठक म्हणाले की, २२ ऑगस्टला VI नेही कन्फर्म केलं की आमचा अहवाल त्यांना मिळाला आहे. आपल्या सिस्टममध्ये हा गोंधळ झाल्याची कबुलीही VI ने २४ ऑगस्ट रोजी दिली आहे. मात्र व्होडाफोन आय़डिया कंपनीने मात्र हा दावा नाकारला आहे. या अहवालात सांगितल्याप्रमाणे, अशा प्रकारे ग्राहकांचा उघड्यावर पडलेला नाही. हा अहवाल खोटा आहे. VI कडे ग्राहकांच्या डेटाच्या संरक्षणासाठी अत्याधुनिक यंत्रणा आहे.

Web Title: Call Data Of 20 Million Vodafone Idea Customers Exposed Claims Report Firm Denies

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..