
Hyundai Creta गाडी किती सुरक्षित आहे? जाणून घ्या ग्लोबल NCAP रेटींग
Hyundai Creta SUV आणि Hyundai i20 प्रीमियम हॅचबॅक कारनी SaferCarsforIndia मोहिमेचा भाग म्हणून ग्लोबल NCAP च्या क्रॅश टेस्ट प्रोग्राममध्ये तीन-स्टार रेटिंग मिळवले आहे. या टेस्टमध्ये टोयोटाच्या अर्बन क्रूझरने 4-स्टार रेटिंग मिळवले आहे. Hyundai Creta आणि Hyundai i20 या दोघांनी अडल्ट ऑक्युपंट आणि चाईल्ड प्रोटेक्शन कॅटेगरीमध्ये थ्री-स्टार रेटिंग मिळवले आहे. ग्लोबल NCAP ने म्हटले आहे की चाचणीतील Hyundai Creta मॉडेल डबल फ्रंट एअरबॅगसह सुसज्ज होते आणि ते यावर्षी 2022 मध्ये तयार केले गेले आहे. Hyundai i20 देखील ग्लोबल NCAP क्रॅश टेस्टमध्ये डबल फ्रंट एअरबॅगसह सुसज्ज होती.
Hyundai Creta ची सुरक्षा रेटिंग
अडल्ट ऑक्यूपेंट प्रोटेक्शन कैटेगरी मध्ये, Hyundai Creta ला 17 पैकी 8 गुण मिळाले आहेत, तर चाइल्ड ऑक्यूपेंट कैटेगरीमध्ये 49 पैकी 28.29 गुण मिळाले आहेत. टेस्ट रिपोर्टमध्ये असेही दिसून आले आहे की या एसयूव्हीची बॉडीशेल इंटिग्रीटी अस्थिर आहे. क्रॅश टेस्ट दरम्यान, ही SUV मध्ये फ्रंट सीटबेल्ट प्री-टेन्शनर्स, SBR आणि फोर-चॅनेल ABS सारख्या सुरक्षा फीचर्सनी सुसज्ज होती. या SUV ने 17 पैकी 8 गुण मिळवले आहेत, तर चाइल्ड ऑक्युपंट सेगमेंटमध्ये 49 पैकी 28.29 गुण मिळाले आहेत.
हेही वाचा: ३ मे पर्यंत मशिदींवरील भोंगे उतरवा अन्यथा…; राज ठाकरेंचा अल्टिमेटम
जागतिक NCAP महासचिव म्हणाले..
जागतिक NCAP महासचिव अलेजांद्रो फ्युरेस म्हणाले की, Hyundai आणि Toyota सारख्या निर्मात्यांनी ESC आणि साइड बॉडी आणि हेड प्रोटेक्शन एअरबॅग्स सारख्या सुरक्षा यंत्रणा भारतात मूलभूत गरज म्हणून सुसज्ज केल्याचे परिणाम निराशाजनक आहेत. म्हणूनच साइड इफेक्ट सुरक्षा आवश्यकता वाढवण्याच्या भारत सरकारच्या पुढाकाराचे ग्लोबल NCAP स्वागत करते. ते म्हणाले की ग्लोबल एनसीएपी जुलैपासून त्यांचे टेस्टिंग प्रोटोकॉल अपडेट करेल. कंपन्यांना रेटिंग मुल्यांकनात यश तेव्हाच मिळेल जेव्हा गाडीत सुरक्षेबाबत दिलेल्या सुविधा या स्टँडर्ड पुर्ण करणाऱ्या असतील असे ते म्हणाले
हेही वाचा: '..तुमच्या घरी रेड का पडत नाही?'; राज ठाकरेंचा सुप्रिया सुळेंना प्रतिप्रश्न
टूवर्ड्स झिरो फाऊंडेशनचे कार्यकारी अध्यक्ष डेव्हिड वार्ड म्हणाले, “आम्ही गेल्या 6 वर्षांत भारतात टेस्ट केलेल्या मॉडेल्सच्या सुरक्षा रेटिंगमध्ये स्थिर प्रगती पाहिली आहे. भारतातील देशांतर्गत वाहन निर्माते ग्लोबल NCAP च्या सुरक्षा आव्हानाला सामोरे गेले आहेत हे विशेषतः स्वागतार्ह आहे. टोयोटा आणि ह्युंदाई सारख्या जागतिक कंपन्यांनी त्याचे अनुसरण केले पाहिजे.
हेही वाचा: PHOTOS : येत्या काही दिवसात लॉन्च होणार 'या' 4 दमदार कार
Web Title: Car Safety Global Ncap Crash Tests Results Hyundai I20 Creta And Toyota Urban Cruiser
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..