
Car Safty : गाडी पार्क करताना 'या' गोष्टींची घ्या काळजी, नाहीतर लागू शकते आग
Car Safty Care : ईव्हीमध्ये आग लागण्याच्या घटना आता फार सामान्य झाल्या आहेत. हैद्राबादमध्ये नुकतीच एका ईव्ही कारमध्ये आग लागल्याने आजूबाजूच्या इतर कार्सनाही आग लागली. या घटनेनंतर ईव्ही कार खरेदी करणाऱ्यांमध्ये कारच्या सेफ्टीविषयी अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे अशा कार पार्क करताना काय काळजी घ्यायला हवी जाणून घ्या.
बऱ्याचदा तांत्रिक खराबींमुळे गाड्यांमध्ये आग लागण्याचे प्रकार वाढत आहेत. शिवाय काही वेळा शॉर्ट सर्किट अशा कारणांनीही गाड्यांमध्ये आग लागण्याचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे कार धारकांनी काही गोष्टींची काळजी घेणं आवश्यक आहे. जाणून घेऊया काय काळजी घ्यावी.
हेही वाचा: Sci-tech : सर्वात स्वस्त QLED
सर्व दरवाजांचे लॉक चेक करा
जर तुम्ही पार्कींगचा वापर करत असाल तर गाडी पार्क करताना सगळ्यात पहिले गाडीचे सर्व दरवाजे लॉक करणं विसरू नका.
याशिवाय गाडीचा गियरबॉक्स आठवणीने लॉक करणं गरजेचं असतं.
हेही वाचा: Sci-tech : वेटर काम करणारा मुलगा झाला चार अब्जचा मालक
सेफ्टीविषयी माहिती करून घेणं आवश्यक
जिथेही तुम्ही गाडी पार्क करत आहात किंवा करणार असाल तिथे सेफ्टीसाठी काय काय सोयी देण्यात आल्या आहेत, याविषयी माहिती करून घ्या.
एका गाडीला आग लागली तर इतर गाड्याही पेटतात. त्यामुळे पार्कींगमध्ये सेफ्टी मेजर काय हे माहित असणं गरजेचं असतं.
कार पार्क करण्याआधी सर्व स्विच बंद करा
जेव्हाही गाडी पार्क कराल तेव्हा लक्षपूर्वक सर्व स्विच ऑफ आहेत का चेक करा. गाडी बंद केल्यावर पटकन एकदा चेक करा. तेच जर तुम्ही सिएनजी कार वापरत असाल तर तुम्हाला अधीक सतर्कता बाळगणं आवश्यक आहे.