Mileage Tips : किती स्पीडमध्ये कार चालवल्यावर मिळतं बेस्ट मायलेज? जाणून घ्या सोपी ट्रिक

तुमची गाडी चांगलं मायलेज देत राहील यासाठी वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.
Car Mileage Tips
Car Mileage TipseSakal

सध्या पेट्रोल आणि डिझेलचे भाव गगनाला भिडलेले आहेत. शिवाय, दिवसेंदिवस वाढत जाणारे हे दर कमी होण्याची शक्यताही नाही. अशात तुमच्या कारचं मायलेज देखील कमी असेल, तर आणखीनच नुकसान होतं. त्यामुळे तुमची गाडी चांगलं मायलेज देत राहील यासाठी वेळीच खबरदारी घेणं गरजेचं आहे.

खूप कमी लोकांना माहिती आहे, की गाडीचं मायलेज हे तिच्या स्पीडवरही अवलंबून असतं. जास्त वेगाने किंवा भरपूर कमी वेगाने गाडी चालवणं हे कारच्या मायलेजसाठी (Car Mileage Tips) धोक्याचं असतं. त्यामुळेच गाडीचं बेस्ट मायलेज मिळवण्यासाठी ठराविक वेगात गाडी चालवणं फायद्याचं ठरतं.

Car Mileage Tips
Automatic Cars : गिअरची कटकट नको म्हणून ऑटोमॅटिक कार घेताय? आधी हे तोटे वाचाच

गैरसमज टाळा

कित्येक लोकांना असं वाटतं की हळू गाडी चालवल्यामुळे पेट्रोलही कमी लागेल, आणि गाडी चांगलं मायलेज (Petrol Car Mileage Tips) देईल. मात्र, हा एक गैरसमज आहे. जेव्हा तुम्ही कमी गिअरमध्ये कमी स्पीडने गाडी चालवता, तेव्हा इंजिनवर अधिक भार पडतो आणि त्याला अधिक इंधनाची गरज भासते. यामुळे मायलेज कमी होत जातं.

७०-१०० हा बेस्ट स्पीड

ऑटोमोबाईल तज्ज्ञांच्या मते ७० ते १०० किलोमीटर प्रतितास एवढा वेग हा पेट्रोल गाड्यांसाठी उत्तम असतो. या स्पीडने गाडी चालवल्यास सगळ्यात बेस्ट मायलेज मिळते. अर्थात, एवढ्या स्पीडने गाडी चालवणं केवळ हायवेवर शक्य होतं. मग जिथे ट्रॅफिक आहे, किंवा शहरात गाडी चालवताना काय करायचं?

गिअरवर ठेवा लक्ष

शहरात गाडी चालवताना आपल्याला वेगावर नियंत्रण ठेवावं लागतं. अशा वेळी स्पीडऐवजी RPM वर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आजकाल सर्व गाड्यांमध्ये स्पीडसोबत RPM मीटरही असते. हे RPM १५०० ते २००० यादरम्यान असावं. याकडे लक्ष दिल्यास कोणत्याही गिअरमध्ये गाडी चालवत असाल तरी बेस्ट मायलेज मिळेल.

Car Mileage Tips
Affordable Cars : दुचाकीवर फॅमिली घेऊन जायची रिस्क नको! बाईकच्या किंमतीत मिळतायत या कार; पाहा यादी

तुम्ही चुकीच्या गिअरमध्ये चुकीच्या वेगात गाडी चालवत असाल, तरीही इंजिनवर अतिरिक्त भार येतो. यामुळे जास्तीचं इंधन लागून कारचं मायलेज कमी होतं. यासाठी योग्य स्पीडवर योग्य गिअरमध्ये गाडी असणं गरजेचं आहे.

पहिल्या गिअरमध्ये ० ते २० किमी, दुसऱ्या गिअरमध्ये २० ते ३० किमी, तिसऱ्या गिअरमध्ये ३० ते ५० किमी, चौथ्या गिअरमध्ये ५० ते ७० किमी आणि पाचव्या गिअरमध्ये ७० किमी प्रतितास याहून अधिक स्पीडने तुम्ही गाडी चालवू शकता. जर, तुमच्या गाडीमध्ये सहावा गिअर असेल, तर यामध्ये १०० किमी प्रतितास हून अधिक वेगाने तुम्ही गाडी चालवू शकता.

यासोबतच, कारच्या मायलेजसाठी टायर प्रेशर, गाडीमधील वजन, कार किती जुनी आहे, ड्रायव्हिंगची शैली अशा अनेक गोष्टी देखील कारणीभूत ठरतात.

Car Mileage Tips
First Car Models : अशा होत्या फेमस कार कंपन्यांच्या पहिल्या गाड्या!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com