Car Care Tips : कार वायपर वापरण्याची योग्य पद्धत बऱ्याच जणांना माहिती नाही, जाणून घ्या योग्य पद्धत l car wiper correct use car maintenance tips how to use car wiper for long time easy tips | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car Care Tips

Car Care Tips : कार वायपर वापरण्याची योग्य पद्धत बऱ्याच जणांना माहिती नाही, जाणून घ्या योग्य पद्धत

Car Care Tips : कारमधल्या प्रत्येक पार्टचं तेवढंच महत्व आहे. कधी कधी नकळत कार पार्ट्सची स्वच्छता आपण टाळतो. गाडीच्या बाहेरील काचेवरील वायपर हा देखील असाच एक भाग आहे, त्याची योग्य काळजी घेणे तर दूरच, बहुतेक लोक त्याचा काळजीपूर्वक वापरही करत नाहीत. म्हणूनच आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्या वापर करून तुम्ही गाडीचं होणारं मोठं नुकसान टाळू शकता.

वाहन कायम सावलीत पार्क करा

तुमचे वाहन उन्हात पार्क करणे टाळावे. रबर उन्हात कडक होतो आणि नीट काम करण्याऐवजी ते गाडीच्या विंडशील्डला स्क्रॅच करते. म्हणूनच आपली कार नेहमी सावलीत पार्क करा.

योग्य ब्लेड मिळवा

कधी कधी असे घडते की तुम्ही ब्लेड लावण्यासाठी एखाद्या ठिकाणी गेलात आणि तुमच्या गाडीला ब्लेड नसेल तर दुकान मालक तुम्हाला कोणतेही ब्लेड देईल. हे टाळले पाहिजे आणि कंपनीने दिलेले ब्लेड तुमच्या कारमध्ये बसवले पाहिजे. जेणेकरून वायपर व्यवस्थित काम करू शकेल.

नेहमी वायपरने पाण्याचा फवारा वापरा

अनेक वेळा विंड स्क्रीनवरील धूळ काढण्यासाठी स्प्रेशिवाय वायपरचा वापर केला जातो, हे टाळावे कारण असे केल्याने ब्लेडचे रबर कापले जाते. त्यामुळे विंडस्क्रीन व्यवस्थित साफ होणे बंद होते आणि वायपर वापरल्यावर त्यावर ओरखडे येतात.

गरज असेल तेव्हाच वापरा वायपर

वायपरचा वारंवार वापर करू नये, खूप गरज असेल तेव्हाच त्याचा वापर करावा. जेणेकरुन वायपर बराच काळ व्यवस्थित काम करू शकेल. वायपरचा अति आणि अनावश्यक वापर टाळावा. (automobile)

मऊ कापड जास्त वापरा

तुम्ही तुमची कार अशा ठिकाणी पार्क करत असाल जिथे विंडशील्ड खूप घाण असते तिथे पुन्हा पुन्हा वायपर वापरण्याऐवजी ते स्वच्छ करण्यासाठी मऊ कापडाचा वापर करावा. याच्या मदतीने वायपरपेक्षा विंडशील्ड अधिक चांगल्या प्रकारे साफ करता येते.

टॅग्स :carautoTips