Data Security : डेटा सिक्युरिटीमधील संधी

जालन्यामधल्या एका महिलेच्या खात्यातले दीड लाख रुपये सायबर भामट्यांनी लंपास केले.
career opportunities in cybersecurity data security
career opportunities in cybersecurity data securitysakal

- डॉ. माधुरी कुलकर्णी

‘जामतारा’ ही वेब सिरीज आपल्यापैकी बहुतांश लोकांनी पाहिलीच असेल. सायबर गुन्हे करणाऱ्या टोळ्यांची कार्यपद्धती कशी असते, याची झलक आपल्याला या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळाली.

आंतरराष्ट्रीय कंपन्या, बँका, संस्था आणि तुमच्या आमच्यासारखे लोक सायबर हल्ल्याला बळी पडल्याच्या घटनांविषयी आपण अनेकदा ऐकतो. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेवर ऑनलाइन ठगांनी थोडा थोडका नाही, तर तब्बल वीस कोटी रुपयांचा गंडा घातल्याची घटना अगदी अलीकडचीच आहे.

जालन्यामधल्या एका महिलेच्या खात्यातले दीड लाख रुपये सायबर भामट्यांनी लंपास केले. वर्क फ्रॉम होमचं ऑनलाइन काम देऊन नफ्याचं आमिष दाखवलं आणि नागपूरमधील एका व्यक्तीला एका ठगानं चक्क सहा लाख रुपयांना गंडा घातला!

दुसऱ्या एका घटनेत ठाणे पोलिसांच्या वेबसाइटसह जवळपास ७० सरकारी वेबसाईट्सवर सायबर हल्ला झाला. हे सगळं अगदी अलीकडचंच, म्हणजेच जुलै २०२३ मधलं! ‘सायबर बुलीइंग’ हा शब्द देखील आजकाल खूप कानावर येतो.

career opportunities in cybersecurity data security
U Mumba चा दिमाखदार खेळ; Bengaluru Bulls विरुद्ध विजयी सलामी

आजकाल जवळपास सर्वच तरुणाई ऑनलाइन जगात वावरत असते. त्यापैकी ८५ टक्क्यांपेक्षा अधिक मुलांना कधी ना कधीतरी सायबर बुलीइंग सहन करावं लागतं. इंटरनेटवरून धमक्या, खोटी आश्वासनं, ब्लॅक मेल अशा स्वरूपात सायबर बुलीइंग केलं जातं.

ऑनलाईन गंडा

फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लाईक्स मिळवण्यासाठी सगळे वेडेपिसे असतात. एका सायबर गुन्ह्यात, एका लाईकसाठी पन्नास रुपये मिळतील असं आमिष दाखवून एका दुकानदाराला जाळ्यात अडकवलं. बनावट फेसबुक किंवा इंस्टाग्राम प्रोफाइल बनविणाऱ्यांचा तर सुळसुळाट झाला आहे.

अशा फेक अकाउंट्सचा वापर, संबंधित व्यक्तीची चुकीची माहिती पसरवून त्या व्यक्तीचं चारित्र्यहनन करण्यासाठी करतात. वर्धा नागरी बँकेवर सायबर दरोडा टाकून सव्वा कोटी लंपास केल्याच्या बातमीनं बँकिंग क्षेत्राला हादरवून सोडलं होतं.

मुलींची फसवणूक, लैंगिक छळ इत्यादी प्रकारचे सायबर गुन्हे देखील खूप वाढले आहेत. पुण्यातल्या एका सॉफ्टवेअर इंजिनियर तरुणाला सेक्सटॉर्शनमध्ये अडकवून सात लाख रुपये उकळण्याची घटना जून २०२३मध्ये घडली.

सेक्सटोर्शन हा फार गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. देशात रोज पाचशेहून अधिक अशा स्वरूपाचे गुन्हे घडतात. त्यातून बाहेर पडणं अतिशय कठीण असतं. पीडित व्यक्तींकडून खंडणीची किंवा गोपनीय माहितीची मागणी केली जाते.

career opportunities in cybersecurity data security
Cyber Crime News: वर्क फ्रॉम होम पाहिजे हा हट्ट पडला महागात; झटक्यात गेले ७ लाख

‘सायबर आर्क’ या ग्लोबल सिक्युरिटी कंपनीनं केलेल्या सर्वेक्षणात असे आढळून आले आहे, की २०२२मध्ये तब्बल ९१ टक्के भारतीय कंपन्यांना रॅनसमवेअर या सायबर हल्ल्यांचा फटका बसला. यासारख्या घटना आणि त्याविषयीची आकडेवारी लक्षात घेतल्यास सायबर हल्ल्यांचं संकट दिवसेंदिवस भीषण होत आहे.

सायबर सिक्युरिटी एक्स्पर्ट

आजकाल ‘डेटा’ ही संपत्ती आहे. यावर कोणी हॅकिंग करून डल्ला मारल्यास प्रचंड नुकसान होऊ शकतं. त्यामुळे सर्व प्रकारचा डेटा सुरक्षित करणं गरजेचं झालं आहे. डेटा संरक्षित करण्यासाठी सायबर सुरक्षा उत्पादनं, त्यांची व्यवस्था आणि सेवा अत्यावश्यक गोष्टी झाल्या आहेत, आणि म्हणूनच सायबर सिक्युरिटी एक्स्पर्टची मागणी आणि गरज दिवसेंदिवस प्रचंड वाढतच आहे.

career opportunities in cybersecurity data security
Nashik Cyber Crime: ऑनलाईन फसवणूक झालेले दीड लाख मिळाले परत; तक्रारदाराने मानले सायबर पोलिसांचे आभार

प्रशिक्षित सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ, सिस्टिम आणि नेटवर्क हॅक होण्यापासून संरक्षित करतात, तसंच वापरकर्त्यांच्या माहितीची गोपनीयता शाबूत ठेवायला मदत करतात. हे तज्ज्ञ अनेक प्रकारच्या व्हायरसेसपासून सुरक्षा पुरवण्याचे काम करतात. बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी सायबर या विषयातील पदवी शिक्षणाची संधी महाराष्ट्रातील विविध महाविद्यालयांत उपलब्ध करून दिली आहे. सायबर सिक्युरिटी या विषयात करिअरच्या उत्तम संधी आहेत. या विषयी आपण पुढील लेखात बोलू.

(लेखिका बी. डी. कर्वे कॉलेज ऑफ आर्टस्, कॉमर्स अँड सायन्स पुणे, येथे प्राचार्या आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com