β पॅकेजिंग क्षेत्र : करिअरची एक नवी वाट

career in packaging
career in packaging

एखादी ग्राहक उपयोगी वस्तू घेतल्यानंतर सबंधित उत्पादन खाद्यपदार्थ असल्यास तो ग्राहकापर्यंत पोहोचवण्यासाठी त्याला एक डबा, प्लॅस्टिक बाटली उत्पादन करणारी एक कंपनी त्यावर प्रिंट करणारी एक कंपनी आणि या दोन्ही गोष्टी ते पॅकेजिंग करणाऱ्या कंपनीला हा कच्चा माल पुरवतात. पॅकेजिंग करणाऱ्या विविध कंपन्या हा कच्चा माल मोठ्या प्रमाणात खरेदी करून त्याचे रुपांतर ग्राहकउपयोगी वस्तूंमध्ये करतात. "पॅकेजिंग क्षेत्रा‘चा विस्तार वेगाने होत आहे. या क्षेत्राविषयी अधिक माहिती: 

या खोक्‍यामध्ये दडलयं काय? 

  • लहानपणापासूनच आपल्याला गिफ्ट रॅप केलेल्या वस्तू किंवा इतर पॅक बंद गोष्टीं विषयी नेहमीच आकर्षण असते. ही पॅकिंगची आयडिया बहुदा निसर्गाकडूनच आपण घेतली आहे असे म्हणायला हरकत नाही.
  • विविध प्रकारच्या बिया, शंख शिंपले, अंडी, सुकामेवा हे "नॅचरल पॅकेजिंगचे उत्तम उदाहरण आहेत. सध्या या पॅकेजिंगचा इंडस्ट्रीची वाढती मागणी होण्यामागे ई-कॉमर्स साईट्‌सचा मोठा हातभार आहे. या साइट्‌सवरून मागवलेली कोणतीही लहान-मोठी व्यवस्थित पॅक करूनच सबंधित ग्राहकांपर्यंत पोहोचते. शॉपिंगमॉलमध्ये मिळणाऱ्या अगदी लहान चॉकलेटपासून गोष्टीपासून मोठ्या इलेक्‍ट्रॉनिक उपकरणांपर्यंत या पॅकेजिंगचे महत्व आहे. दैनंदिन वापरातील वस्तूंमधील पापड, लोणची, पाण्याचे भरलेले ग्लास यांचे बारकाईने निरिक्षण केल्यास त्यामागील पॅकिंगच्या कौशल्याचे आपल्याला कल्पना येते. मुंबईतील डबेवाले हे देखील चांगल्या पॅकेजिंगचे आदर्श उदाहरणच आहे.


पॅकेजिंग म्हणजे नक्की काय? 

  • एखादे उत्पादन ग्राहकापर्यंत सुरक्षितपणे पोहोचण्यासाठी त्याला केलेले वेष्टन. ती वापरण्यायोग्य राहण्यासाठी दिलेले संरक्षण. या वेष्टनांवर उत्पादन तिथी, उत्पादनाच्या संदर्भात इतर माहिती देणे बंधनकारक असते, त्यासाठी लेबलिंग हा महत्वाचा मुद्दा येतो. यावर ग्राहकाला नजरेच्या एका टप्प्यात वस्तू किंवा पदार्थाविषीची माहिती सर्व माहिती मिळते.
  • जितके आकर्षक पॅकिंग तितकाच त्या वस्तूचा खप अधिक. याचे चांगले उदाहरण म्हणजे लहान मुलांची खेळणी, बाहुल्या, स्टेशनरी इत्यादी...
  • पॅकेजिंगसाठी व्यावहारिक विज्ञानाचा (अप्लाइड सायन्स) वापर करून सबंधित उत्पादन ग्राहकापर्यंत पोहोचवणे. 


पॅकेजिंगमधील इतर महत्वाच्या गोष्टी 

  • कायद्याने लेबलवर काही गोष्टी असणे आवश्‍यक आहे त्या खालील प्रमाणे : उत्पादकाचे नाव आणि संपर्काचा पत्ता, उत्पादनाचे वर्णन, वजन (ब्रेडसारख्या काही उत्पादनांसाठी हे अपवाद असते.), वजनानुसार उतरत्या क्रमाने घटकांची यादी, किंमत, पदार्थ बनवण्याची पद्धतीविषयी सूचना, साठवण्याच्या पद्धतीविषयी सूचना,वापरण्यायोग्य कालावधी (बेस्ट बिफोर डेट), वापरानंतर नष्ट करण्याची पद्धत
  • पर्यावरणपूरक पॅकेजिंग (ग्रीन पॅकेजिंग) : सध्या ग्लोबल वार्मिंगमुळे तसेच दैनंदिन जीवनात प्लॅस्टिकचा वाढता वापर कचरा विल्हेवाटीची समस्या यांचा विचार केल्यास ग्रीन पॅकेजिंगच्या वापराने पर्यावरणाचे नुकसान टाळण्यासाठी आपला हातभार लागू शकतो. या ग्रीन पॅकेजिंगचे तीन प्रकार आहेत.
  • रियुझेबल पॅकेजिंग
  • रिसायकेबल पॅकेजिंग 
  • बायोडिग्रेडेबल पॅकेजिंग 

पर्यावरणात सहज विघटन होणारे घटक ग्रीन पॅकेजिंगमध्ये वापरले जातात. काचेच्या बाटल्यांसारख्या वस्तू या साफ करून पुर्नवापर शक्‍य. एकदा वापरून झाल्यानंतर या वस्तूंचा वापर त्यावर प्रक्रिया करून पुन्हा पॅकेजिंगसाठी किंवा इतर कोणत्या कारणासाठी केला जाऊ शकतो. पॅकेजिंगमध्ये वापरले जाणारे काच, धातू, पुठ्ठे, कागद यांसारखे घटक या प्रकारात मोडतात. 

उलाढाल 
भारतात यासाठी लागणारा कच्चा माल उपलब्ध असल्याने या क्षेत्राची वृध्दी होण्यास हा महत्वाचा घटक आहे. सध्या पॅकेजिंगमधील अत्याधुनिक तंत्रज्ञान तसेच या क्षेत्राची उलाढाल आसपास आहे. प्लॅस्टिक पॅकेजिंग बाजाराता दरवर्षी 20-25 टक्‍क्‍यांनी म्हणजे 68 लाख आणि कागद पॅकेजिंग उद्‌योगात 76 लाख टन अशी वाढ होत आहे. या क्षेत्रात सध्या फूड पॅकेजिंग क्षेत्रात वेगाने वाढ होत आहे. यामागचे कारण म्हणजे ग्राहकांना जास्त सेफ, हायजिनिक पॅकबंद पदार्थ हवे असतात. 

करिअर 

  • तुम्हाला जर या क्षेत्रामध्ये करिअर करायचे असल्यास विज्ञान शाखेतून बारावीची उत्तीर्ण झाल्यानंतर नवी मुंबईमध्ये टाटा इनस्टीट्यूट ऑफ सोशल सायन्स (मुंबई),  साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी या संस्थांमध्ये प्रिंटिंग आणि पॅकेजिंगमध्ये बीई करण्याची संधी उपलब्ध आहेत. (मुंबई),  इंडियन इन्स्टीट्युट ऑफ पॅकेजिंग (मुंबई)
  • बारावीनंतर उच्चशिक्षणासाठी हा उत्तम पर्याय आहे.
  • औषधनिर्माण, पर्सनल केअर उत्पादने, आरोग्याशी निगडीत क्षेत्रात, अन्न आणि पॅकबंद पदार्थ, अवजड वस्तू उद्योग तसेच आज ई-कॉमर्स क्षेत्रात येण्यास प्रचंड संधी निर्माण होत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com