LPG Cylinder Booking: गॅस सिलिंडर बुकिंगवर मिळेल १ हजारांपर्यंत कॅशबॅक

ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप Paytm च्या माध्यमातून गॅस सिलिंडर बुकिंग केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो.
Cashback on LPG Cylinder Booking by Paytm
Cashback on LPG Cylinder Booking by PaytmSakal

Cashback on LPG Cylinder Booking by Paytm: गेल्या काही दिवसांपासून देशातील महागाई गगनाला भिडलेली आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच एलपीजी गॅस सिलिंडरच्या किंमतींनी ऐतिहासिक उच्चांक गाठला आहे. गॅस सिलिंडरच्या किंमती सतत वाढत असताना तुम्ही स्वस्तात गॅस सिलेंडर विकत घेऊ शकता. गॅस सिलिंडरवर बुकिंगवर जर तुम्हाला कॅशबॅक मिळाला तर ग्राहकांना नक्कीच फायदा होऊ शकतो. ऑनलाईन पेमेंट अ‍ॅप Paytm च्या माध्यमातून गॅस सिलिंडर बुकिंग केल्यास ग्राहकांना कॅशबॅक मिळू शकतो. हा कॅशबॅक कसा मिळवायचा हे आज आपण जाणून घेणार आहोत.

Cashback on LPG Cylinder Booking by Paytm
गॅस सिलिंडर एक हजाराला! 'उज्वला'ची सबसिडी फक्‍त एक ते पाच रुपये

गॅस सिलिंडरचं बुकिंग करण्यासाठी आपण विविध मार्ग अवलंबतो. काही जण कॉल किंवा मॅसेजच्या माध्यमातून, तर काहीजण थेट एजन्सीमध्ये जाऊन गॅस सिलिंडर बुक करतात. परंतु याठिकाणी तुम्हाला रितसर पैसे देऊन तुम्ही सिलिंडर घेऊ शकता. परंतु विविध ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून तुम्ही गॅस सिलिंडर बुक केल्यास तुम्हाला आकर्षक कॅशबॅक मिळू शकतो. Paytm च्या माध्यमातून गॅस सिलिंडरवर कॅशबॅक मिळवण्यासाठी पुढील स्टेप्स फॉलो करा.

Cashback on LPG Cylinder Booking by Paytm
IPPB अ‍ॅपवरूनही करता येणार सिलिंडर बुकिंग, 'अशी' आहे प्रक्रिया

LPG सिलिंडरवर असा मिळवा कॅशबॅक:

  • तुमच्या स्मार्टफोनमध्ये Paytm अ‍ॅप ओपन करा.

  • आता अ‍ॅपमध्ये Book gas Cylinder या पर्यायावर टॅप करा.

  • आता तुम्ही Bharatgas/ HP Gas/ Indane यापैकी ज्या कंपनीचा गॅस वापरता तो गॅस प्रोव्हाइडर निवडा.

  • आता तुमचा एलपीजी आयडी किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर टाका.

  • त्यानंतर Proceed या ऑप्शनवर टॅप करा.

  • टॅप केल्यानंतर तुमच्या मोबाईल स्क्रीनवर एक पेज येईल. त्यातील Apply Promocode पर्यायावर टॅप करा.

  • आता तुम्हाला FIRSTGAS कोड टाकावा लागेल.

  • येथील प्रोमोकोडद्वारे १ हजार रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळू शकतो.

  • आता तुम्हाला पेमेंट करावं लागेल.

  • पेमेंट करताच कॅशबॅक तुमच्या बँक खात्यात जमा होईल.

नोंद- पेटीएमच्या माध्यमातून पहिल्यांदाच गॅस सिलेंडर बुक करत असाल तरच कॅशबॅकचा मिळू शकतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com