
Cyber Security Alert : भारतातील सायबर सुरक्षेसंदर्भात महत्त्वाची जबाबदारी निभावणाऱ्या CERT-In (Indian Computer Emergency Response Team) ने Google Chrome वापरकर्त्यांसाठी हाय-रिस्क अलर्ट जारी केला आहे. या इशाऱ्यानुसार, Chrome ब्राउझरमधील काही गंभीर त्रुटी (vulnerabilities) हॅकर्सना तुमचा डेटा आणि डिव्हाइसेसचा गैरवापर करण्याची संधी देऊ शकतात. त्यामुळे Windows, Mac आणि Linux वापरकर्त्यांनी तातडीने ब्राउझर अपडेट करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
CERT-In ने CIVN-2025-0007 आणि CIVN-2025-0008 या दोन मोठ्या सुरक्षाजन्य त्रुटी ओळखल्या आहेत. या त्रुटींमुळे हॅकर्सला ब्राउझरच्या कमकुवत भागांचा फायदा घेता येतो, ज्यामुळे डेटा चोरी, अनधिकृत प्रवेश आणि डिव्हाइस कंट्रोल घेण्याचा धोका वाढतो.
CIVN-2025-0007: Windows आणि Mac साठी 132.0.6834.83/8r या व्हर्जनच्या आधीच्या Chrome ब्राउझरवर परिणाम होतो.
CIVN-2025-0008: Windows आणि Mac साठी 132.0.6834.110/111 आणि Linux साठी 132.0.6834.110 या व्हर्जनच्या आधीच्या Chrome ब्राउझरवर परिणाम होतो.
Windows, Mac आणि Linux ऑपरेटिंग सिस्टमवर Chrome वापरणारे सर्व पीसी व लॅपटॉप युजर्स या सुरक्षाज्ञेच्या कक्षेत येतात.
स्मार्टफोन युजर्सवर तुलनेने कमी परिणाम होईल, मात्र त्यांच्यासाठीही सतर्कता बाळगण्याची सूचना देण्यात आली आहे.
CERT-In च्या अहवालानुसार, Chrome ब्राउझरमध्ये खालील प्रकारच्या धोकेदायक त्रुटी आढळल्या आहेत:
✅ Out-of-bounds memory access – JavaScript इंजिनमध्ये मोठी त्रुटी
✅ Integer Overflow – ग्राफिक्स लायब्ररी Skia मध्ये समस्या
✅ Stack buffer overflow आणि Out-of-bounds read – डेटा प्रोसेसिंगमध्ये सुरक्षा त्रुटी
✅ Race conditions आणि insufficient data validation – Frames आणि Extensions मध्ये अडचणी
✅ Navigation, Fullscreen, Payments, Extensions आणि Compositing यासारख्या फिचर्समध्ये चुकीच्या अंमलबजावणीमुळे ब्राउझरला धोका
CERT-In ने तातडीने Chrome अपडेट करण्याचा इशारा दिला आहे. सुरक्षिततेसाठी खालील स्टेप्स फॉलो करा.
1️⃣ Chrome ब्राउझरचे व्हर्जन तपासा
➡ Settings > About Chrome वर जाऊन ब्राउझर अपडेट आहे का ते पाहा.
2️⃣ तातडीने अपडेट करा
➡ जर तुमचा Chrome जुन्या व्हर्जनवर असेल, तर लगेच नवीनतम अपडेट इंस्टॉल करा.
3️⃣ सावधगिरी बाळगा
➡ अनोळखी लिंक्स क्लिक करू नका किंवा संशयास्पद फाईल्स डाउनलोड करू नका.
Chrome हा जगभरात सर्वाधिक वापरला जाणारा ब्राउझर असल्याने सायबर गुन्हेगार सतत नवीन हल्ल्यांचे मार्ग शोधत असतात. जर तुम्ही ब्राउझर अपडेट केला नाही, तर तुमच्या वैयक्तिक माहितीवर आणि बँकिंग तपशीलावर हॅकर्सचा हल्ला होऊ शकतो. त्यामुळे Chrome सतत अपडेट ठेवणे हा तुमच्या सायबर सुरक्षेसाठी आवश्यक उपाय आहे. तुमच्या Chrome ब्राउझरचे अपडेट चेक करा आणि सुरक्षित राहा!
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.