Whatsapp New Feature : व्हॉट्‌सॲपमध्ये आणखी एका जबरदस्त फीचरची एंट्री; सोशल मीडिया प्रेमींसाठी खूपच फायद्याचं, अशा शेअर करा पोस्ट

WhatsApp multiple accounts switching feature : व्हॉट्‌सॲपने आयफोन वापरकर्त्यांसाठी मल्टीपल अकाउंट्स वापरण्याची सुविधा आणली आहे, ज्यामुळे वापरकर्ते एकाच अ‍ॅपमध्ये दोन अकाउंट्स वापरू शकतात.
WhatsApp multiple accounts switching feature
WhatsApp multiple accounts switching featureesakal
Updated on

Whatsapp multiple accounts Feature : व्हॉट्‌सॲपने iPhone युजर्ससाठी नवे फिचर आणले असून, यामुळे एका ॲपमध्ये एकाचवेळी एकापेक्षा जास्त अकाउंट्स वापरणे शक्य होणार आहे. Meta च्या या लोकप्रिय मेसेजिंग ॲपचा जगभरात प्रचंड वापर आहे, ज्यात भारतातच ५० कोटींहून अधिक सक्रिय युजर्स आहेत. Android आणि iPhone या दोन्ही प्लॅटफॉर्मवर वापरल्या जाणाऱ्या या ॲपमध्ये आता एकाच डिव्हाइसवर अनेक अकाउंट्स चालवण्याची सुविधा मिळणार आहे. ही सुविधा काही दिवसांतच अँन्ड्रॉईड मोबाईलसाठी देखील सुरू होणार आहे.

iPhone युजर्ससाठी मल्टिपल अकाउंट्सचे फिचर

अनेक जण एका स्मार्टफोनमध्ये दोन सिम कार्ड वापरतात. मात्र, दोन्ही नंबरसाठी WhatsApp वापरण्यासाठी त्यांना स्वतंत्र ॲपची आवश्यकता असते, जे अनेक डिव्हाइसवर शक्य होत नाही. काही लोक त्यासाठी दुसऱ्या फोनचा वापर करतात. मात्र, व्हॉट्‌सॲपच्या नव्या मल्टिपल अकाउंट्स फिचरमुळे iPhone युजर्स आता एका ॲपमध्ये दोन्ही अकाउंट्स सहजपणे वापर करू शकतील. iOS च्या 25.2.10.70 या अपडेटसह हे फिचर उपलब्ध होणार आहे.

WhatsApp multiple accounts switching feature
DeepSeek AI : चीनच्या DeepSeek AI मॉडेलने जगात घातला धुमाकूळ; ChatGPT अन् NVIDIA ला दिलं चॅलेंज, फ्रीमध्ये सुविधा, नेमका विषय काय?

अकाउंट्स स्विच करणे झाले सोपे

प्रत्येक WhatsApp अकाउंटला स्वतंत्र चॅट बॅकअप, सेटिंग्ज असणार आहे. त्यामुळे कोणत्याही गोंधळाशिवाय युजर्स अकाउंट्स दरम्यान सहज स्विच करू शकतील. या फिचरमुळे व्यवसायिक आणि वैयक्तिक अकाउंट्स वेगवेगळे ठेवणे अधिक सुलभ होणार आहे.

व्हॉट्‌सॲपने आणखी एक नवे फिचर सादर केले आहे, ज्यामुळे युजर्स आपले WhatsApp अकाउंट Meta च्या अकाउंट्स सेंटरशी लिंक करू शकतील. यामुळे WhatsApp स्टेटस अपडेट्स थेट Facebook आणि Instagram Stories वर शेअर करता येतील. हे फिचर वैकल्पिक असून डिफॉल्टने बंद ठेवलेले आहे. त्यामुळे युजर्स स्वतःच्या गरजेनुसार ते चालू किंवा बंद करू शकतात.

WhatsApp multiple accounts switching feature
Whatsapp Deleted Message : कुणीतर व्हॉट्‌सॲपवर मेसेज पाठवून लगेच डिलिट केला? मिनिटांत वाचा सगळी हिस्ट्री, कसं पाहा एका क्लिकवर

सोशल मीडिया युजर्ससाठी फायदेशीर

जे लोक सोशल मीडियावर सक्रिय असतात आणि WhatsApp, Facebook, आणि Instagram यांचा वापर वारंवार करतात, त्यांच्यासाठी हे फिचर मोठा बदल ठरणार आहे. यामुळे एका क्लिकवर सर्व प्लॅटफॉर्मवर स्टेटस किंवा अपडेट्स शेअर करता येणार असल्याने वेळ वाचणार आहे.

व्हॉट्‌सॲपचे हे नवे फिचर वापरकर्त्यांचा अनुभव अधिक सोपा आणि सुलभ करण्यासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. iPhone युजर्ससाठी मल्टिपल अकाउंट्स वापरण्याची ही सुविधा खूपच फायद्याची ठरणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com