esakal | एलन मस्‍कच्या टेस्‍लाला सूट देण्यापूर्वी मोदी सरकारने ठेवली 'ही' अट
sakal

बोलून बातमी शोधा

एलन मस्‍कच्या टेस्‍लाला सूट देण्यापूर्वी मोदी सरकारने ठेवली 'ही' अट

एलन मस्‍कच्या टेस्‍लाला सूट देण्यापूर्वी मोदी सरकारने ठेवली 'ही' अट

sakal_logo
By
नामदेव कुंभार

अमेरिकेतील नामांकीत ऑटो कंपनी टेस्लाच्या भारतात इलेक्ट्रिक वाहननिर्मिती करणार आहे. भारत सरकारसोबत तशी चर्चाही झाली आहे. टेस्लाचे प्रमुख एलॉन मास्क यांनी भारत सरकारकडे आयात कर कमी करण्याची मागणी केली होती. यावर भारत सरकारकडून आधी उत्पादन सुरु करण्याचा सल्ला टेस्ला कंपनीला दिला आहे. त्यानंतर आयात कर कमी करण्यावर चर्चा करुयात, असं सांगण्यात आलं आहे. टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांनी या वर्षाच्या अखेरपर्यंत टेस्लाची कार भारतात येणार असल्याची घोषणा केली होती. मोदी सरकार आणि टेस्ला यांच्यातील करार व्यवस्थित पार पडल्यास भारतात टेस्ला कारची निर्मिती होणार आहे.

टेस्ला कंपनीने आधी भारतात प्रकल्प सुरु करावा. त्यानंतर कंपनीला विशेष सूट मिळेल असे संकेत केंद्रातील अवजड उद्योग मंत्रालयाने दिले आहेत. टेस्लाने प्रथम भारतात प्रकल्प उभारून वाहननिर्मितीला सुरुवात करावी. त्यानंतरच करातून कंपनीला सूट देण्यासंदर्भात विचार केला जाईल, असे अवजड उद्योग मंत्रालयाकडून सांगण्यात आले. भारत सरकारच्या या निर्णायावर टाटा मोटर्सने नाराजी व्यक्त करत भारताच्या 'मेक इन इंडिया' प्रोजेक्टला धक्का बसेल असं म्हटलेय. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याच्या घडीला केंद्र सरकारकडून कोणत्याही वाहन कंपनीला सूट किंवा तत्सम लाभ दिला जात नाही. त्यामुळे टेस्ला कंपनीसाठी आयात शुल्कात कपात केल्यास देशात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक करणाऱ्या इतर कंपन्यांपर्यंत अयोग्य संदेश जाईल.

हेही वाचा: गुजरातच्या मुख्यमंत्र्यांनी का दिला राजीनामा? ही असू शकतात कारणं

टेस्लाने भारतात इलेक्ट्रिक वाहनांवरील (EV) आयात कर कमी करण्यात यावेत, अशी मागणी केली आहे. सध्याच्या घडीला विदेशातून आयात करण्यात येणाऱ्यावर पूर्णपणे तयार युनिट्स (completely built units) प्रमाणे कर आकारले जातात. यामध्ये इंजनाच्या आकारापासून निर्मिती खर्चाचाही समावेस असतो. या सर्वांच्या आधारावर 60 ते 100 टक्केंचं आयातशुल्क आकारले जाते. टेस्ला कंपनीने हे शुल्क 40 टक्क्यांवर आणण्याची मागणी केली होती. तसेच इलेक्ट्रिक कारवर सामाजिक कल्याण अधिभारही 10 टक्के इतका कमी करण्यात यावा, असे टेस्लाचे म्हणणे आहे.

केंद्रीय परिवाहन मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, आगामी काळात भारतात इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढण्याचे संकेत आहेत. त्यामुळे भारतात टेस्लाचा प्रकल्प स्थापन करण्यासाठी हीच योग्य वेळ आहे. टेस्लासाठी ही सुवर्णसंधी असेल. दरम्यान सध्या भारतात टाटा, हुंदाई, महिंद्रा, जॅग्वार, एमजी, ऑडी, मर्सिडीज या कंपन्यांकडून इलेक्ट्रिक कारची विक्री केली जाते. यामध्ये आता टेस्लाची भर पडणार आहे.

loading image
go to top