
Google Chrome hacking alert : भारत सरकारच्या सायबर सुरक्षेसाठी कार्यरत असलेल्या CERT-In (Indian Computer Emergency Response Team) या संस्थेने Google Chrome वापरकर्त्यांसाठी गंभीर इशारा जारी केला आहे. विंडोज, मॅक आणि लिनक्स ऑपरेटिंग सिस्टिमवर Chrome वापरणाऱ्यांसाठी ही माहिती अतिशय महत्त्वाची आहे. CERT-In च्या मते, Chrome मध्ये आढळलेल्या अनेक त्रुटींचा फायदा घेत सायबर गुन्हेगार तुमचं डेटा चोरू शकतात किंवा तुमचं डिव्हाइस रिमोटने कंट्रोल करू शकतात.
१० मे २०२५ रोजी CERT-In ने दिलेल्या अलर्टमध्ये Google Chrome ब्राउझरमधील खालील प्रकारच्या त्रुटींचा उल्लेख करण्यात आला आहे
HTML मधील Heap Buffer Overflow
Out-of-bounds Memory Access
DevTools मध्ये चुकीची अंमलबजावणी
अपुरी Data Validation
या त्रुटींचा फायदा घेण्यासाठी हॅकर्स खोट्या वेबसाईट्सचा वापर करून युजर्सना फसवतात आणि त्यामार्फत ते तुमचं खाजगी डेटा चोरी करू शकतात किंवा तुमचं सिस्टिम हॅक करून रिमोट अॅक्सेस घेऊ शकतात.
जर खालील Chrome आवृत्त्या (versions) तुमच्या डिव्हाइसवर वापरात असतील, तर तुम्ही या धोक्याच्या झोनमध्ये येता
Linux: 136.0.7103.59 च्या आधीचे एडिशन
Windows / macOS: 136.0.7103.48 किंवा 49 च्या आधीचे एडिशन
Google ने या त्रुटी दुरुस्त करण्यासाठी नवीन सुरक्षा अपडेट्स जारी केली आहेत. खालील स्टेप्सने तुमचं Chrome अपडेट करा
Chrome उघडा
वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन डॉट्स वर क्लिक करा
Settings > About Chrome या पर्यायावर जा
Chrome आपोआप नवीन अपडेट शोधेल
अपडेट मिळाल्यास ते इंस्टॉल करा आणि ब्राउझर रिस्टार्ट करा
हे केवळ नियमित अपडेट नाही. ही त्रुटी Remote Code Execution प्रकाराची असल्यामुळे हॅकर्स व्यक्तीगतच नव्हे, तर व्यावसायिक सिस्टम्सही टार्गेट करू शकतात. CERT-In ने या इशाऱ्याला ‘High Severity’ दर्जा दिला आहे, त्यामुळे अपडेट करणे अत्यावश्यक आहे.
Chrome कायम अपडेट ठेवा
Settings > About Chrome वर जाऊन अपडेट तपासा.
Safe Browsing मोड अॅक्टिव्ह करा
Settings > Privacy and Security > Security > Enhanced Protection निवडा.
बळकट आणि वेगवेगळे पासवर्ड वापरा
Chrome चा Password Manager वापरून सुरक्षित पासवर्ड जनरेट करा.
Settings > Autofill > Password Manager
फक्त विश्वासार्ह एक्सटेंशन्स वापरा
chrome://extensions/ येथे जाऊन संशयास्पद एक्सटेंशन्स हटवा.
ब्राउझिंग डेटा नियमितपणे क्लिअर करा
Settings > Privacy and Security > Clear Browsing Data वापरा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.