Google Chrome : 'गुगल क्रोम' वापरणाऱ्यांना सरकारने दिला गंभीर इशारा, अशा प्रकारे ठेवा स्वतःला सुरक्षित

CERT Warning : क्रोममधील काही त्रुटी हाय-रिस्क असल्याचं सीईआरटीने म्हटलं आहे.
Google Chrome
Google ChromeeSakal

इंटरनेट सर्फिंग करण्यासाठी आपल्याला वेब ब्राऊजरची मदत घ्यावी लागते. जगातील सर्वात लोकप्रिय ब्राऊजर्समध्ये गुगल क्रोमचा समावेश होतो. या ब्राऊजरचे जगभरात कोट्यवधी यूजर्स आहेत. तुम्हीदेखील हेच वेब ब्राऊजर वापरत असाल, तर केंद्र सरकारने तुम्हाला एक धोक्याचा इशारा दिला आहे.

इंडियन कम्प्युटर इमर्जन्सी रिस्पॉन्स टीम (CERT-In) ने गुगल क्रोममधील काही त्रुटी समोर आणल्या आहेत. यामुळे यूजर्सचा डेटा हॅक होण्याचा धोका असल्याचं सांगण्यात येत आहे. या त्रुटी हाय-रिस्क असल्याचं सीईआरटीने म्हटलं आहे.

Google Chrome
Google Earthquake Alert : भूकंपाचा इशारा देणार गुगल, भारतात फीचर लाँच! अशी करा सेटिंग

सीईआरटी-इन ही सायबर सिक्युरिटी संबंधित काम करणारी संस्था आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुगल क्रोममधील काही त्रुटींमुळे हॅकर्स सध्या तेथील सिक्युरिटी आणि फायरवॉल सहज क्रॉस करू शकत आहेत. त्यामुळे यूजर्सची गोपनीय माहिती, गुगलवर सेव्ह असणारे पासवर्ड किंवा कम्प्युटरमधील डेटा चोरला जाण्याची शक्यता आहे.

अशी घ्या खबरदारी

गुगलने क्रोम ब्राऊजरच्या नव्या अपडेटमध्ये या त्रुटींवर मात केली आहे. त्यामुळे यूजर्सनी आपलं क्रोम ब्राऊजर तातडीने अपडेट करणं गरजेचं आहे. तसंच कम्प्युटर, लॅपटॉप, मोबाईल अशा डिव्हाईसमध्ये सुरक्षित आणि विश्वासार्ह असं अँटी व्हायरस सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यावं असा सल्लाही तज्ज्ञांनी दिला आहे.

Google Chrome
Google Pixel : गुगलच्या नव्या पिक्सेल 8 आणि 8 प्रोचे फीचर्स लीक; किंमतही आली समोर - रिपोर्ट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com